५१ खासदारांनी विनवणी करूनही राहुल गांधी राजीनाम्यावर ठाम

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली | लोकसभा निवडणुकीत सपाटून पराभूत झाल्या नंतर पराभवाची जबादारी स्वीकारून राहुल गांधी यांनी काँग्रेस अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर काँग्रेस कमिटीने त्यांचा राजीनामा एक महिन्यासाठी स्थगित करून त्यांना अध्यक्ष पदी कायम राहण्यासाठी सांगितले. याच पार्श्वभूमीवर सोनिया गांधी यांच्या अध्यक्षते खाली आज ५१ खासदारांची बैठक आज पार पडली. या बैठकीत ५१ खासदारांनी विनवणी करूनही राहुल गांधी आपल्या राजीनाम्यावर ठाम राहिले.

पराभवाची जबाबदारी सामोहिक आहे. त्यामुळे तुम्ही राजीनामा देऊ नये असे खासदार शशी थरुर आणि मनीष तिवारी यांनी म्हणले. त्यावर राहुल गांधी यांनी आपण पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा देत असल्याचे म्हणले. त्यानंतर ५१ खासदारांनी राहुल गांधी यांना राजीनामा मागे घेण्याची विनंती केली तरी देखील राहुल गांधी आपल्या राजीनाम्यावर कायम असल्याचे चित्र बघायला मिळाले.

दरम्यान युवक काँग्रेसच्या सदस्यांनी राहुल गांधींच्या निवासस्थानाबाहेर मोठी गर्दी करत राजीनामा मागे घेण्याचा आग्रह केला. राहुल यांनी अध्यक्षपदी कायम राहण्याची मागणी कार्यकर्त्यांनी केली. मात्र राहुल यांनी राजीनामा मागे घेणार नसल्याचं स्पष्ट केलं. लोकसभा निवडणुकीतील दारुण पराभवानंतर काँग्रेसच्या कार्यकारणीची बैठक झाली होती. त्यामध्ये राहुल गांधींनी अध्यक्षपद सोडणार असल्याचं म्हटलं होतं