मी माझ्या मित्राला गमावले; सातव यांच्या निधनाने राहुल गांधी हळहळले

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | काँग्रेसचे राज्यसभेचे खासदार राजीव सातव यांच कोरोनाने निधन झालं. त्यांच्यावर पुण्यातील जहांगीर रुग्णालयात उपचार सुरू होते. राजीव सातव हे राहुल गांधी यांचे अंत्यत जवळचे म्हणून ओळखले जायचे. त्यांच्या निधनानंतर राहुल गांधी यांना अपार दुःख झालं. राहुल गांधी यांनी ट्विट करत राजीव सातव यांना श्रद्धांजली वाहिली.

राहुल गांधी यांचे ट्वीट 

“मी माझ्या मित्राला गमावले. राजीव सातव यांच्या निधनामुळे मी फार दु:खी आहे. ते कॉंग्रेसच्या आदर्शांना प्रत्यक्षात उतरवणारे एक नेते होते. त्यांच्याकडे प्रचंड क्षमता होती. त्यांचे जाणे हे आपल्या सर्वांसाठी फार मोठे नुकसान आहे. मी त्यांच्या कुटुंबियांप्रती संवदेना व्यक्त करतो,” असे ट्वीट राहुल गांधी यांनी केले आहे.

दरम्यान, राजीव सातव हे राहुल गांधी यांचे विश्वासू नेते म्हणून ओळखले जायचे. सातव हे हिंगोलीचे माजी खासदार आहेत. 2014 मध्ये मोदी लाटेतही त्यांचा विजय झाला होता. काँग्रेस आणि गांधी घराण्याची निष्ठा असल्याने त्यांच्याकडे गुजरातच्या काँग्रेस प्रभारीपदाची जबाबदार देण्यात आली होती.

ब्रेकिंग बातम्या सर्वांत अगोदर मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 9028429273 हा नंबर तुमच्याकडील WhatsApp ग्रुपला Add करा.

You might also like