दुर्देवी ः ईद दिवशी गरम शिरखुर्म्यात पडून दीड वर्षाच्या बालकाचा मृत्यू

सांगली जिल्ह्यातील मिरज येथील घटना

सांगली | मिरज येथील ईदगाहनगर येथे गरम शिरखुर्म्यात पडल्याने अरहान मोहसीन मणेर या दीड वर्षाच्या बालकाचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. ईद दिवशीच घडलेल्या घटनेबाबत इदगाहनगर परिसरात हळहळ व्यक्त होत होती.

शुक्रवारी सकाळी ईदची तयारी सुरू असताना मोहसीन मणेर यांच्या घरात ही दुर्घटना घडली. सकाळी दहा वाजता घरात मोठ्या पातेल्यात शिरखुर्मा बनवून ठेवला होता. घरात कॉटखाली शिरखुर्म्याचे पातेले ठेवून मणेर कुटुंब घराबाहेर कामात व्यस्त होते.

घरात आतमध्ये पलंगावर झोपलेला दीड वर्षाचा अरहान उठल्यानंतर कॉटवरून खाली उतरताना गरम शिरखुर्म्याच्या पातेल्यात पडला. अरहानच्या ओरडण्याने कुटुंबीयांनी खोलीत धाव घेतली. भाजल्याने गंभीर जखमी झालेल्या अरहानला रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, तेथे त्याचा मृत्यू झाल्याचे डाॅक्टरांनी सांगितले.

You might also like