कामगारांना आहे तिथंच ठेवण्यावर केंद्र सरकारचा भर; आता जनता अन्याय सहन करणार नाही – राहुल गांधी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी आज देशभरातील विविध माध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला. या संवादात देशभरात कोरोनाव्हायरस संदर्भातील प्रश्नांवर सुरु असलेल्या चर्चेचा उहापोह राहुल गांधी यांनी केला. काँग्रेस प्रस्तावित करत असलेली न्याय योजना तात्काळ लागू करुन देशभरातील गरिबांच्या खात्यावर ७५०० रुपये जमा करण्याची मागणी यावेळी राहुल गांधी यांनी केली आहे. याशिवाय केंद्र सरकार देशातील मजुरांच्या बाबतीत गंभीरपणे विचार करत नसल्याची टीकाही राहुल गांधी यांनी केली. मजुरांची आरोग्य तपासणी आवश्यक असली तरीसुद्धा त्यात दिरंगाई करुन मजुरांना आणखी त्रास देऊ नका अशी विनंतीही राहुल गांधी यांनी यावेळी केंद्र सरकारला केली.

कामगारांना लॉकडाऊन वाढवत नेत हतबल करण्याचं काम केंद्र सरकारने केलं आहे. परप्रांतीय मजुरांनी आपापल्या राज्यात परत जावं असं सरकारला अद्यापही वाटत नसल्याचं राहुल गांधी पुढे बोलताना म्हणाले. काँग्रेसशासित राज्यांमध्ये कुठल्याही मुख्यमंत्र्यांना आम्ही सूचना देत नसून त्यांच्या निर्णयक्षमतेचा वापर करण्याचं स्वातंत्र्य दिलं असल्याचंही गांधींनी यावेळी स्पष्ट केलं.

कोरोनाव्हायरसची तीव्रता वाढत असली तरीसुद्धा कोसळणाऱ्या अर्थव्यवस्थेला सावरण्यासाठी लोकांच्या हातात पैसा जाणं गरजेचं असून कुठल्याही परिणामांचा अधिक विचार न करता अन्याय सहन करायला लावणाऱ्या सरकारला लोकं माफ करणार नाहीत असा अप्रत्यक्ष टोला राहुल गांधी यांनी यावेळी नरेंद्र मोदींना लगावला. मोठे उद्योग सुरू झाले नाहीत तर लघु उद्योगांना चालना कशी मिळणार असा सवालही राहुल गांधी यांनी उपस्थित केला. देशभरातील पत्रकारांशी जवळपास दीड तास राहुल गांधींनी संवाद साधला.

Leave a Comment