पक्ष सोडणाऱ्यांसाठी दारं खुली आहेत; पायलट यांच्या बंडखोरीवर राहुल गांधींची आक्रमक भूमिका

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी राजस्थानमधील सत्तासंघर्षावर आज मोठं वक्तव्य केलं आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या राजस्थानमधील राजकीय बंडखोरीवर त्यांनी बोट ठेवलं आहे. काँग्रेसचे बंडखोर नेते सचिन पायलट यांचा थेट उल्लेख टाळत राहुल गांधींनी परखड भाष्य केलं आहे. पक्ष सोडणाऱ्यांसाठी दारं खुली आहेत, त्यांना घाबरण्याची गरज नसल्याचे असं राहुल गांधी म्हणाले आहेत. काँग्रेसच्या विद्यार्थी संघटना एनएसयूआयच्या राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांसोबत व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे झालेल्या बैठकीत राहुल गांधी बोलत होते.

ज्यांना पक्ष सोडून जायचा आहे त्यांनी खुशाल जावं. पक्षाचं दारं तुमच्या सारख्या तरुण नेत्यांसाठी खुली आहेत, असं राहुल गांधी एनएसयुआयच्या बैठकीत म्हणाले.काँग्रेसच्या काही नेत्यांकडून सचिन पायलट यांच्याबाबत सहानुभूती दाखवली जात आहे. मात्र राहुल गांधींचं हे वक्तव्य आक्रमक भूमिका दर्शवत आहे. काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी सचिन पायलट यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला, मात्र पायलट आपल्या भूमिकेवर ठाम राहिले. त्यामुळे काँग्रेसने कारवाई करताना मागे पुढेही पाहिलं नाही. सूत्रांच्या माहितीनुसार राहुल गांधी यांनीही सचिन पायलट यांच्याशी चर्चा केली. मात्र त्यानंतर आधी कारवाई आणि आता राहुल गांधी यांचं आलेलं वक्तव्य यावरुन ते कोणत्याही नेत्याच्या दबावात येणार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे.

दरम्यान आजच्या एनएसयूआयच्या बैठकीत राहुल गांधी यांच्यासोबत एनएसयूआयचे राष्ट्रीय अध्यक्ष नीरज कुंदन, प्रभारी रुची गुप्ता आणि राष्ट्रीय पदाधिकाऱ्यासोबत काँग्रेसचे संघटन महासचिव के सी वेणुगोपाल उपस्थित होते. वेणुगोपाल सध्या राजस्थानमधील राजकीय संकटाच्या पार्श्वभूमीवर तिथे उपस्थित आहेत.

राहुल गांधींनी गळ घातल्याने उपमुख्यमंत्री झालो- सचिन पायलटसचिन पायलट यांनी इंडिया टुडेला विशेष मुलाखत दिली. या मुलाखतीत सचिन पायलट यांनी आपल्याला उपमुख्यमंत्री व्हायचं नव्हतं. हा निर्णय पूर्णपणे राहुल गांधी यांचा होता. राहुल गांधी यांनी गळ घातल्यानंतर आपण राजस्थानचे उपमुख्यमंत्रिपद स्वीकारण्यास तयार झालो, असं पायलट यांनी सांगितलं. सत्तेचं आणि कामाचं समसमान वाटप करावं, असे निर्देश राहुल गांधी यांनी गहलोत यांना दिले होते. मात्र त्याऐवजी मुख्यमंत्री गहलोत यांनी आपल्याला बाजूला सारलं, अपमानीत केलं, असा गंभीर आरोप सचिन पायलट यांनी अशोक गहलोत यांच्यावर केला आहे. तर राजस्थान सरकार पाडण्यासाठी सचिन पायलट हे स्वतः सक्रिय होते. आमदारांच्या घोडेबाजाराचे तेच खरे सूत्रधार आहेत, असं उत्तर मुख्यमंत्री गहलोत यांनी सचिन पायलट यांच्या आरोपांना दिलं. दरम्यान, मी भाजपमध्ये जाणार नाही, मी माझी रणनीति तयार करत आहे. काही लोकांनी मी भाजपमध्ये जाणार असल्याच्या अफवा पसरवल्या असल्याचं सचिन पायलट यांनी म्हटलं आहे.

Leave a Comment