व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

कर्नाटकातील विजयानंतर राहुल गांधींची मोठी प्रतिक्रिया; म्हणाले, जनतेने दाखवून दिले की….

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने सत्ताधारी भाजपला धूळ चारत विजयाच्या दिशेने वाटचाल केली आहे. आत्तापर्यत हाती आलेल्या कलानुसार, काँग्रेस १३६ जागांवर आघाडीवर असून भाजप अवघ्या ६५ जागांवर आघाडीवर आहे. या विजयानंतर काँग्रेस नेते राहुल यांनी याचे श्रेय कर्नाटकातील जनतेला दिले आहे. आम्ही कोणाचा द्वेष न करता प्रेमाने ही लढाई लढलो आणि कर्नाटकाच्या जनतेने दाखवून दिले की या देशाला प्रेम चांगलं वाटत असं राहुल गांधी यांनी म्हंटल.

दिल्लीतील काँग्रेस मुख्यालयाच्या बाहेर आयोजित पत्रकार परिषदेत राहुल गांधी म्हणाले, सर्वप्रथम कर्नाटक मधील जनता, आमचे नेते, कार्यकर्ते यांचं मी अभिनंदन करतो आणि त्यांना शुभेच्छा देतो. हा कर्नाटकच्या जनतेचा विजय आहे. हा निकाल म्हणजे सामान्य जनतेनं भांडवल शाहीला हरवलं आहे. कर्नाटकाच्या जनतेने दाखवून दिले की या देशाला प्रेम चांगलं वाटत.

काँग्रेस पक्ष कर्नाटकात गरिबांच्या सोबत उभा होता. गरिबीच्या मुद्द्यांवर आम्ही लढत होतो, आणि आम्ही कोणाचा द्वेष न करता प्रेमाने ही लढाई लढलो. कर्नाटकात द्वेषाचा बाजार बंद झाला असून प्रेमाची दुकाने उघडली आहेत. निवडणूक प्रचारात आम्ही जी 5 वचने कर्नाटकच्या जनतेला दिली होती ती पहिल्या कॅबिनेट मधेच पूर्ण करू अशी ग्वाही सुद्धा राहुल गांधी यांनी दिली.