हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गुजरातमधील बिल्किस बानो प्रकरणातील बलात्कार आणि हत्या प्रकरणी ११ आरोपींच्या सुटकेनंतर काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला. मोदीजी, तुमच्या बोलण्यात आणि वागण्यातला फरक संपूर्ण देशाला दिसत आहे अशी टीका त्यांनी केली. तसेच नारी शक्तीबाबत खोट्या वलग्ना करणारे महिलांना नेमका काय संदेश देत आहेत असा सवालही राहुल गांधींनी केला.
राहुल गांधी यांनी ट्विट करत म्हंटल की, 5 महिन्यांच्या गर्भवती महिलेवर ज्यांनी बलात्कार केला आणि तिच्या 3 वर्षांच्या मुलीची हत्या केली त्यांना आझादी के अमृत महोत्सवा दरम्यान सोडण्यात आले. महिला शक्तीची खोटी चर्चा करणारे देशातील महिलांना काय संदेश देत आहेत? पंतप्रधान, तुमच्या बोलण्यात आणि वागण्यातला फरक संपूर्ण देशाला दिसत आहे असं म्हणत राहुल गांधी यांनी मोदींवर निशाणा साधला.
5 महीने की गर्भवती महिला से बलात्कार और उनकी 3 साल की बच्ची की हत्या करने वालों को 'आज़ादी के अमृत महोत्सव' के दौरान रिहा किया गया।
नारी शक्ति की झूठी बातें करने वाले देश की महिलाओं को क्या संदेश दे रहे हैं?
प्रधानमंत्री जी, पूरा देश आपकी कथनी और करनी में अंतर देख रहा है।
— Rahul Gandhi (@RahulGandhi) August 17, 2022
दरम्यान, गुजरातमध्ये गोध्रा दंगलीवेळी बिलकिस बानो या महिलेवर सामूहिक बलात्कार केल्याप्रकरणी सजा भोगत असलेल्या 11 दोषींची आज सुटका करण्यात आली आहे. गुजरात सरकारच्या माफी धोरणानुसार हा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार 11 दोषींची सोमवारी गोध्रा उप कारागृहातून सुटका करण्यात आली. 3 मार्च 2002 रोजी बिलकिस बानो यांच्यावर सामूहिक बलात्कार झाला होता. जेव्हा बलात्कार झाला त्यावेळी त्या पाच महिन्यांच्या गर्भवती होत्या