8 चित्ते तर आले, पण 16 कोटी रोजगार का नाही आले? राहुल गांधींचा मोदींना सवाल

rahul gandhi narendra modi
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । तब्बल 70 वर्षांनंतर भारतात चित्ते परतले आहेत. दक्षिण अफ्रिकेतील नामिबियातून हे चित्ते आज सकाळी मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर येथे आणण्यात आले. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या सर्व चित्त्यांना कुनो नॅशनल पार्कमध्ये सोडण्यात आले. यानंतर भारत जोडो यात्रेवर असलेले काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी बेरोजगारीचा मुद्दा उपस्थित करत मोदींवर निशाणा साधला आहे.

राहुल यांनी याबाबत ट्विट करत म्हंटल की, आठ चित्ते तर आले, पण आता हे सांगा ८ वर्षांमध्ये १६ कोटी रोजगार का नाही आले?,असा सवाल त्यांनी केला आहे. यावेळी त्यांनी हॅशटॅग राष्ट्रीय बेरोजगार दिवस असा उल्लेखही केला आहे.राहुल गांधी यांच्या या ट्विटला भाजप नेते कस प्रत्युत्तर देतात हे आता पाहावं लागेल.

दक्षिण अफ्रिकेतील नामिबियातून ८ चित्ते आज सकाळी मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर येथे आणण्यात आले. नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या सर्व चित्त्यांना कुनो नॅशनल पार्कमध्ये सोडण्यात आले. यावेळी मोदींनी फोटोसेशन केल्याचेही पहायला मिळाले. या आठ चित्त्यांमध्ये पाच मादी तर तीन नर चित्ते आहेत. या आठ चित्त्यांसाठी कुनो राष्ट्रीय उद्यानात विशेष क्षेत्र तयार करण्यात आले आहे. नामिबियाहून आल्यानंतर चित्त्यांना काही काळ क्वारंटाइनमध्ये ठेवण्यात येणार आहे. कुनो नॅशनल पार्क हे 748 चौरस किलोमीटरवर पसरलेलं संरक्षित क्षेत्र आहे. या पार्कमध्ये चित्त्यांसाठी 12 किमी लांब कुंपण उभारण्यात आले आहे.