जुगार अड्ड्यावर छापा ः खटाव, माण व फलटण तालुक्यातील 26 जणांवर गुन्हा, 33 लाख 64 हजारांचा मुद्देमाल जप्त

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा | खटाव तालुक्यातील निढळ येथे जुगार खेळणाऱ्या २६ जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या ठिकाणाहून ३३ लाख ६४ हजार ७७० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या कारवाईत खटाव, माण व फलटण तालुक्यातील समावेश आहे. सहायक पोलिस अधीक्षक आंचल दलाल, सहायक पोलिस निरीक्षक चेतन मछले व कर्मचाऱ्यांनी हा छापा टाकला.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहीती अशी, निढळ येथील घाडगे वस्तीवरील अरुण पांडुरंग खुस्पे यांच्या पोल्ट्री शेडमध्ये विजय सुभाष खवळे (रा. नेर, ता. खटाव) व निखिल सुनील कोकाटे (रा. खटाव) हे बेकायदा जुगार अड्डा चालवित असल्याची माहिती पोलिस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांना मिळाली होती. त्यांनी सहायक पोलिस अधीक्षक आंचल दलाल यांना कारवाईचे आदेश दिले होते. त्यानुसार दलाल यांनी कर्मचाऱ्यांसह, तसेच पुसेगावच्या कर्मचाऱ्यांना घेऊन निढळ येथे या जुगार अड्डयावर छापा टाकला. यावेळी तेथे एकूण २६ जण जुगार खेळत असल्याचे आढळून आले.

या ठिकाणी विजय सुभाष खवळे (रा. नेर), निखिल सुनील कोकाटे (रा. खटाव), संजय मारुती धडस वय 35 राहणार वडगाव तालुका मान गोरख श्रीपती बोरगे (वय ५४, रा. खटाव), राजेंद्र शंकर लावंड (रा. उंबरमळे), संतोष किसन शिंदे (वय ४३, रा. ठाकुरकी नवामळा, ता. फलटण), श्रीकृष्ण चंद्रकांत शिंदे (वय ३८, रा. खटाव), विद्यासागर कृष्णाजी माने (वय ४६, रा. हिंगणे रोड, वडूज), शिवाजी अंकुश इंगळे (वय ३६, रा. वडगाव, ता. माण), गोरख आनंदराव पवार (वय ३५, रा. भाजी मंडई, फलटण), बबलू ठाकूर पंडित (वय २७, रा. निढळ), अमोल ऊर्फ अजित हणमंत जाधव (वय १९, रा. डीसीसी बँकेजवळ, वडूज), अजमत नजीर कुरेशी (वय ३५, रा. मंगळवार पेठ, फलटण), दत्तात्रय शिवाजी वायदंडे (वय ४४, रा. आण्णा भाऊ साठेनगर, खटाव), राजेंद्र आनंदराव गोडसे (वय ४१, रा. एसबीआय बँकेसमोर, वडूज ) कृष्णा नामदेव जाधव (वय ३८, रा. एमएसईबी रोड, दहिवडी), अक्षय नागेश ननावरे (वय २८, रा. वाकेश्वर रोड, वडूज), बसवलिंग सिद्धलिंग साखरे (वय ५०, रा. सिद्धनाथ मंदिराजवळ, दहिवडी), जगन्नाथ शंकर अवघडे (वय ४६ रा. कन्याशाळेजवळ, दहिवडी), बाजीराव भीमराव जगदाळे, (वय ४८, रा. फुलेनगर रोड, दहिवडी), हणमंत संपत मदने (वय २८, रा. निढळ) सुरेश बुवाजी काळे (वय) ४२, रा. जुनी बाजारपेठ, वडूज), सुनील रामदास साळुंखे (वय ४६, रा. झिरपे गल्ली, फलटण), सोहेल सलिम शेख (वय ३६, रा. पिंपरद, ता. फलटण), अमोल भानुदास जाधव (वय ३३, रा. नवलेवाडी, ता. माण), अमोल देवकर (रा. दहिवडी) हे पोलिसांना तीन पानी जुगार खेळताना मिळून आले.

या छाप्यात पोलिसांनी रोख रक्कम ५७ हजार ५७० रुपये, २१ मोबाईल हॅडसेट, सात चारचाकी वाहने, नऊ दुचाकी वाहने, तसेच १८ दारूच्या बाटल्या असा एकूण ३३ लाख ६४ हजार ७७० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. या कारवाईत सहायक पोलिस अधीक्षक आंचल दलाल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस अंमलदार चव्हाण, जांभळे, कोरडे, शिंदे, कदम, दीक्षित, तसेच पुसेगाव ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक चेतन मछले, पोलिस उपनिरीक्षक बाळासाहेब लोंढे, पोलिस अंमलदार आनंदराव जगताप, सुधीर येवले, सचिन माने, आनंदा गंबरे, सचिन जगताप, पुष्कर जाधव, किरण देशमुख, इम्तियाज मुल्ला यांनी सहभाग घेतला.