विजयराज खुळे शिवसेनेत, सुनील तटकरे यांना मोठा धक्का

संग्रहित छायाचित्र
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

रायगड प्रतिनिधी | रायगड जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसला लागलेली गळती थांबायचं नाव घेत नाही. राष्ट्रवादीचे जिल्हा प्रवक्ते विजयराज खुळे यांनी सोमवारी शिवसेनेत प्रवेश केला. मातोश्रीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांना शिवबंधन बांधले. यावेळी आमदार भरत गोगावले, माजी आमदार तुकाराम सुर्वे, जिल्हाप्रमुख अनिल नवगणे, प्रमोद घोसाळकर उपस्थित होते.

अलीकडेच सुनील तटकरे यांचे पुतणे अवधूत तटकरे, भाऊ अनिल तटकरे तसेच जिल्हाध्यक्ष प्रमोद घोसाळकर यांनी शिवसेनेत प्रवेश केला. त्यामुळे खासदार सुनील तटकरे यांना जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर एकापाठोपाठ एक धक्के बसत आहेत. विजयराज खुळे हे मूळचे शिवसैनिक असून राज्यातील शिवसेनेचे पहिले जिल्हा परिषद सदस्य राहिले आहेत. ते दक्षिण रायगडातील बडे राजकीय प्रस्थ असून जिल्हाप्रमुख पदाची जबाबदारीही त्यांनी सांभाळली होती. खुळे यांच्या प्रवेशाने दक्षिण रायगडात शिवसेनेला आणखी बळ मिळणार आहे.