रेल्वे बजेटविषयी ‘हे’ तुम्हाला माहित हवंच..!!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

टीम हॅलो महाराष्ट्र । भारतासारख्या मोठ्या देशात रेल्वेचं जाळं खूप विस्तारलेलं आहे. देशाच्या अर्थव्यवस्थेतील मोठी जबाबदारी रेल्वेद्वारे केल्या जाणाऱ्या वाहतुकीतून पार पाडली जाते. या रेल्वे बजेटविषयीच्या काही रंजक गोष्टी जाणून घेणं गरजेचं आहे.

१. रेल्वे वाहतुकीचा अंदाज घेत रेल्वे मंत्रालयाकडून सादर केलं जाणारं वार्षिक आर्थिक विवरणपत्र म्हणजे रेल्वे अर्थसंकल्प होय. रेल्वे मंत्रालयामार्फत केंद्रीय रेल्वे मंत्र्यांकडून हा अर्थसंकल्प सादर करण्यात येतो.

२. १८५३ मध्ये ब्रिटिश शासन असताना पहिल्यांदा रेल्वे अर्थसंकल्प सादर करण्यात आला. भारतातील पहिली रेल्वेही त्याच वेळी सुरु झाल्याचं तुम्हांला माहित असेलच.

३. १९२० साली ब्रिटिश रेल्वे अर्थतज्ञ विल्यम अकवर्थ यांनी दिलेल्या शिफारशीनुसार १९२४ पासून रेल्वे अर्थसंकल्प हा मुख्य अर्थसंकल्पासोबत सादर न करता वेगळा सादर केला जाऊ लागला. ही परंपरा मोदी सरकारच्या पहिल्या काळात म्हणजे २०१६ पर्यंत चालू होती. म्हणजेच साधारण ९२ वर्षं रेल्वे अर्थसंकल्प मुख्य अर्थसंकल्पापेक्षा वेगळा सादर केला गेला.

४. लालूप्रसाद यादव यांनी सलग ६ वेळा रेल्वे अर्थसंकल्प सादर केला आहे. २००४ ते २००९ या कालखंडात लालूंनी हे अर्थसंकल्प सादर केले. आपल्या कारकिर्दीत १०८ अब्ज रुपयांची तरतूद लालूंनी रेल्वेसाठी केली.

५. तृणमूल काँग्रेसच्या ममता बॅनर्जी या रेल्वे अर्थसंकल्प सादर करणाऱ्या भारताच्या पहिल्या आणि एकमेव महिला आहेत. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री होण्याआधी त्यांनी रेल्वेमंत्रीपद भूषवलं असून संयुक्त पुरोगामी आघाडी (UPA) आणि राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) या दोघांकडूनही अर्थसंकल्प सादर करणाऱ्या त्या एकमेव व्यक्ती आहेत.

६. २०१४ साली व्ही. सदानंद गौडा यांनी सादर केलेल्या रेल्वे अर्थसंकल्पात बुलेट ट्रेन आणि हाय स्पीड रेल्वे रस्त्यांचा अंतर्भाव केला.

७. अभ्यासू रेल्वे अर्थसंकल्प सादर करणारा मंत्री म्हणून सुरेश प्रभू यांनी २०१४ ते २०१७ या कालावधीत आपली छाप पाडली असून त्यांच्या काळात रेल्वे सोशल मीडिया आणि डिजिटल माध्यम पूरक बनली असंही म्हटलं जातं.

८. सप्टेंबर २०१७ पासून पियुष गोयल हे रेल्वेमंत्रीपदाची धुरा सांभाळत असून २०१६ नंतर रेल्वे अर्थसंकल्प हा मुख्य अर्थसंकल्पसोबतच सादर केला जाऊ लागला आहे.

ताज्या बातम्या थेट तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी आजच आमच्या 8080944419 या नंबरवर Whatsapp करा आणि लिहा ”Hello News”

हे पण वाचा-

अर्थसंकल्पात वापरल्या जाणाऱ्या कागदपत्रांमध्ये नक्की कशाचा समावेश होतो?

अर्थसंकल्प दरवर्षी का सादर करतात?

राज ठाकरेनंतर आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर सर्वांच्या नजरा