हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Railway Budget 2023 : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडून 2023 च्या अर्थसंकल्पात रेल्वेसाठी मोठी घोषणा करण्यात आली आहे. यावेळी रेल्वेसाठी अर्थसंकल्पात 2.4 लाख कोटी रुपयांची तरतूद केली गेली आहे. 2013-14 च्या अर्थसंकल्पापेक्षा हे जवळपास 9 पटींनी जास्त आहे. 2013 मध्ये रेल्वेसाठीच्या अंदाजपत्रकात सुमारे 63,363 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती. हे लक्षात घ्या कि, आतापर्यंतचा रेल्वेचा हा सर्वाधिक भांडवली खर्च आहे.
गेल्या काही वर्षात रेल्वेमध्ये खूप वेगाने बदल झाल्याचे दिसून आले आहेत. त्याचप्रमाणे त्यामध्ये सातत्याने सुधारणा देखील केली जाते आहे. भारतीय रेल्वेकडू आता पर्यटक मार्गांवर नवीन डिझाइन केलेले व्हिस्टा डोम एलएचबी कोच लाँच करण्याची योजना आखली जात आहे. ज्यामुळे प्रवाशांना प्रवासाचा उत्तम अनुभव मिळणार आहे. Railway Budget 2023
सध्या देशात बुलेट ट्रेनचे काम सुरू आहे. मात्र आता वंदे भारत देशाच्या प्रत्येक प्रमुख मार्गावर नेण्यावर सरकारने जास्त भर दिला आहे. याशिवाय रस्ते मार्गाने माल वाहतुकीचा खर्च कमी करण्यावरही भर दिला जातो आहे. त्यासाठी फ्रेट कॉरिडॉरच्या कामाला आणखी वेग देता येईल. यासाठी देशातील अनेक मोठ्या राज्यांमध्ये मालगाड्या धावण्यासाठी नवीन ट्रॅक टाकावे लागणार आहेत. Railway Budget 2023
हलक्या वॅगनचे डबे बनविण्यावर भर
रेल्वेचा विस्तार करण्यासाठी पायाभूत सुविधांवर मोठा खर्च करावा लागणार आहे. त्याच प्रमाणे फ्रेट कॉरिडॉरसाठी विजेचा वापरही वाढवावा लागेल, कारण तेलावर धावणाऱ्या लांब पल्ल्याच्या मालवाहतूक गाड्या चालवणे नुकसानीचे ठरेल. ज्यामुळे विजेचे इन्फ्राही रेल्वेसाठी तयार करावे लागणार आहेत. तसेच अॅल्युमिनियमचे डबे बनविण्यावरही जास्त लक्ष केंद्रित केले जाऊ शकते, कारण ते लोखंडी डब्यांपेक्षा खूपच हलके असतात आणि ते जास्त वजनही सहन करू शकतात. यावेळी इन्फ्रावरील पैसे 20 टक्क्यांनी वाढवण्याची मागणी करण्यात आली आहे. Railway Budget 2023
अर्थसंकल्पाच्या 20 टक्के रेल्वेला मिळण्याची अपेक्षा
यावेळी रेल्वेला मोठी रक्कम मिळण्याची अपेक्षा असल्याचे बजट तज्ज्ञ सांगतात. इन्फ्रावरील खर्च वाढवण्यासाठी बजेटच्या 20 टक्के फंडस् एकट्या रेल्वेला दिला जाऊ शकतो, असा अंदाज वर्तवला जात आहे. चालू आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पात रेल्वेला 1,40,367 कोटी रुपये देण्यात आले होते. Railway Budget 2023
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://youtube.com/live/uMj699Dopoo
हे पण वाचा :
CIBIL Score म्हणजे काय ??? याचा कर्जाच्या पात्रतेवर कसा परिणाम होतो ते समजून घ्या
HDFC कडून होम लोनवरील व्याज दरात वाढ, आता ग्राहकांना द्यावा लागणार जास्त EMI
Jio च्या ‘या’ प्लॅनमध्ये 1 वर्षाच्या व्हॅलिडिटीसोबत मिळवा अनलिमिटेड कॉलिंग अन् डेटा
Gold Price Today : सोन्या-चांदीच्या किंमतींत वाढ, जाणून घ्या आजचा नवीन भाव
Ayushman Bharat Yojana : केंद्र सरकारच्या ‘या’ योजनेंतर्गत मिळवा 5 लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार, अशा प्रकारे तपासा पात्रता