नवी दिल्ली : वृत्तसंस्था – केंद्र सरकारच्या ‘अग्निपथ योजने’ला (Agneepath Yojana) भारतातील अनेक भागांतून विरोध केला जात आहे. उत्तर भारतामध्ये सुरू असलेल्या हिंसाचाराचे लोण आता दक्षिण भारतामध्येही पसरले आहे. या आंदोलनाचा सर्वात जास्त फटका रेल्वेला बसला आहे. आंदोलकांनी अनेक ठिकाणी ट्रेन पेटवून या योजनेचा निषेध केला आहे. एकीकडे काही लोक रेल्वेचं मोठं नुकसान करत असताना दुसरीकडे स्वतःच्या जीवाची पर्वा न करता इतरांच्या मदतीसाठी पुढे येणारे अनेक लोकसुद्धा पाहायला मिळत आहेत. बिहारमधील गया या ठिकाणी ठिकाणी अशीच एक घटना पाहायला मिळाली. त्यामध्ये एका रेल्वे कर्मचाऱ्याने आपला जीव धोक्यात घालून इतरांचे प्राण वाचवले आहेत.
अग्निपथ योजनेच्या (Agneepath Yojana) विरोधादरम्यान, ट्विटरवर नुकताच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. जो या कठीण काळातही आशा देतो की आजही देशात असे लोक आहेत ज्यांना या देशाचं आणि देशवासीयांचं भलं करायचं आहे. हा व्हिडिओ खास आहे कारण यामध्ये एक रेल्वे कर्मचारी जीवाची पर्वा न करता ट्रेनचे डबे वेगळे करताना दिसतो, जेणेकरून पुढच्या बोगीतील आग मागील डब्यांपर्यंत पोहोचू नये. तो प्रवासी आणि इतर लोकांच्या मदतीने ट्रेनच्या डब्याला पुढे ढकलताना दिसत आहे.
https://twitter.com/RajaramUbhe/status/1538125196934418433
या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. या व्हिडिओवर अनेक लोकांच्या प्रतिक्रिया येत आहेत. आंदोलकांनी(Agneepath Yojana) आग लावण्याच्या कृत्याचं समर्थन करताना एका व्यक्तीने लिहिलं – “रेल्वे कर्मचाऱ्यांचं पोट भरलेलं होतं. ज्यांचं पोट रिकामं होतं त्यांनी आग लावली. प्रत्येकाने आपापल्या धर्माचं पालन केलं.” आणखी एकाने लिहिलं, “ज्यांनी बोगी वेगळी केली आणि नंतर ती पुढे ढकलली, त्या लोकांनी सैन्यात भरती व्हायला पाहिजे. हे लोक सैन्यात भरती होण्यासाठी पूर्णपणे पात्र आहेत. त्यांच्यात निर्भयता, माणुसकी आणि एकत्र काम करण्याची क्षमता आहे.” अशा अनेक प्रतिक्रिया दिल्या आहेत.
हे पण वाचा :
हुंड्यासाठी छळ केल्याने विवाहितेची आत्महत्या : सासूसह चाैघांवर गुन्हा दाखल
मोदींच्या आईचे 100 व्या वर्षात पदार्पण; पाय धुवून मोदींनी घेतले आशीर्वाद
IND vs SA: हार्दिक पांड्याने दिला ‘हा’ सल्ला आणि Dinesh Kartikनं 16 वर्षांनी रचला इतिहास
सतेज पाटील यांचं नाव वापरून महिलेची फसवणूक; ‘एवढ्या’ लाखांचा घातला गंडा
बीड जिल्हा रुग्णालयात जोरदार राडा, आत्महत्या करणाऱ्या विवाहितेच्या पती आणि सासूला मारहाण