हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अवघ्या जगाला वेठीस धरणाऱ्या करोना विषाणूनं भारतातही झपाट्यानं पाय पसरण्यास सुरूवात केली आहे. अशा परिस्थितीत गेल्या दोन दिवसांत रेल्वेने घराकडे निघालेल्या अनेक प्रवाशांमध्ये करोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. त्यामुळं २५ मार्च पर्यंत रेल्वे सेवा बंद ठेवण्याच्या प्रस्तावावर चर्चा सुरु आहे. याबाबत रेल्वे मंत्रालयाकडून अधिकृत माहिती दिली नाही आहे. दरम्यान, दुपारी ३ वाजता रेल्वे मंत्रालय याबाबत मोठा निर्णय घेऊ शकते. असं रेल्वेच्या सूत्रांकडून सांगण्यात येत आहे.
विदेशातून आलेले अनेक करोना संक्रमित प्रवासी घरी जाण्यासाठी विमान प्रवासाला बगल देत रेल्वेने प्रवास करतानाच्या घटना समोर आल्या आहेत. रेल्वेतील गर्दी आणि संक्रमणाचा मोठा धोका लक्षात घेता रेल्वे मंत्रालय याबाबत मोठा निर्णय घोषित करू शकते. रेल्वे प्रवाशांच्या माध्यमातून करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी रेल्वे सेवा बंद करण्याचा प्रस्तावावर सध्या रेल्वे मंत्रालय चर्चा करत आहे. या प्रस्तावात काही विभागात रेल्वे सेवा बंद करण्याचं म्हटलं गेलं आहे.
दिवसभरातील बातम्या तुमच्या मोबाईलवर मिळवण्यासाठी 8080944419 या नंबरवर ”Hello News” टाईप करून त्वरित Whatsapp करा.