हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यातील कोरोनाचा उद्रेक पाहता राज्य सरकार कडून मुंबई लोकल अजून सुरू केली नाही. फक्त अत्यावश्यक सेवेतील लोकांसाठीच मुंबई लोकल उपलब्ध आहे. अशातच भाजपा खासदार आणि केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी रेल्वे राज्यमंत्री पदाची सूत्र स्विकारताच मुंबई लोकल संदर्भात महत्त्वाची घोषणा केली आहे.
लोकल प्रवासाबाबत राज्य सरकारने जबाबदारी स्वीकारली आहे. ज्यावेळी राज्य सरकारला वाटेल आता करोनाची स्थिती आटोक्यात आली आहे आणि रेल्वे सुरु करणं गरजेचे आहे तेव्हा राज्याने केंद्राला प्रस्ताव पाठवावा. त्यावर अभ्यास करून लोकल सेवा सुरू करू त्यात काही अडचण नाही असं रावसाहेब दानवेंनी स्पष्टपणे सांगितले
दरम्यान, यापूर्वी राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी लोकल वर भाष्य करताना म्हंटल होत की जोपर्यंत कोरोना संपत नाही तोपर्यंत मुंबई लोकल सुरू होणार नाही. मुंबई ही राज्याची राजधानी असून गर्दीचं ठिकाण आहे त्यामुळे लोकल सुरू करणार नाही .