हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : राज्यपाल भगतसिह कोशारी यांनी आज मुख्यमंत्री ठाकरे यांना पत्र पाठवत भाजपने केलेल्या मागणीबाबत निर्णय घ्यावा, असे सांगितले. यावरून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राज्यपालांवर टीका केली आहे. “राजभवन हे भाजपच कार्यालय झालाय. ते भाजप, आरएसएस कार्यकर्त्यांसारखे वागतात,” असे पटोले यांनी म्हंटल आहे.
भाजपच्या शिष्टमंडळाने बुधवार, दि. 23 रोजी राज्यपाल भगतसिह कोशारी यांची भेट घेतली होती. यावेळी विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, चंद्रकांत पाटील आदी उपस्थित होते. यावेळी फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकार कोरोनाचे कारण सांगत दोन दिवस अधिवेशन घेत आहे. तसेच राज्यपालांनी पत्र पाठवल्यानंतर विधानसभा अध्यक्षांची निवडणूक घ्यावी लागते. हे सरकार विधानसभा अध्यक्षांचीही निवडणूक घेत नाही. असे निवेदनाद्वारे म्हंटले होते. त्यानंतर राज्यपालांनी मुख्यमंत्री ठाकरे याना भाजपने केलेल्या मागण्यांबाबत निर्णय घेण्याचे पत्र पाठवले. यावरून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष पटोले यांनी राज्यपालांवर टीका केली आहे.
राज्यातील राजभवन हे एक प्रकारचे भाजपचे कार्यालयच झाले आहे. देशात प्रथमच अशा प्रकारचे चित्र पहायला मिळत आहे. तर राज्यपाल भगतसिह कोशारी हे भाजप व आरएसएस यातील कार्यकर्त्यांसारखे वागत आहेत, असे पटोले यांनी म्हंटले आहे. पटोले यांनी केलेल्या या टीकेनंतर भाजप याला काय उत्तर देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.