हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । दसरा मेळाव्या वरून शिवसेना आणि शिंदे गटात पुन्हा एकदा चुरस पाहायला मिळाली. अखेर मुंबई हायकोर्टाने उद्धव ठाकरेंनाच शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्याची परवानगी दिली. कोर्टाच्या या निर्णयामुळे शिंदे गटाला मात्र मोठा धक्का बसला. त्यानंतर आता मनसे नेते प्रकाश महाजन यांनी एक मोठा गौप्यस्फोट केला आहे. दसरा मेळव्याबाबत राजकारण करू नये, ते कोतेपणाचे लक्षण दिसेल असा सल्ला मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे याना दिला होता असं महाजन म्हणाले.
एका वृत्तवाहिनीशी बोलताना प्रकाश महाजन म्हणाले, जेव्हा दसरा मेळाव्याचा विषय निघाला त्यावेळी आमच्या पक्षातील सुद्धा काही तरुण कार्यकर्त्यांचे म्हणणे होते की, राज ठाकरेंनी सुद्धा दसरा मेळावा घ्यावा. मात्र वर्षोनुवर्षे दसरा मेळावा म्हणजे बाळासाहेब ठाकरे आणि शिवाजी पार्क हे समीकरण घट्ट आहे. या समीकरणात आपण जाणे म्हणजे कोतेपणाच लक्षण ठरेल. हे समीकरण असेच राहिले पाहिजे. त्यामुळे दसरा मेळाव्यासाठी मी फारसा उत्सुक नाही असे राज ठाकरे म्हणाले होते, असाच सल्ला त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सुद्धा दिल्याचे महाजन म्हणाले.
एकनाथ शिंदे- अंबानी भेट; रात्री उशिरा दोघांत तासभर खलबतं
वाचा सविस्तर-👉🏽 https://t.co/zuaxxHfYIw#hellomaharashtra @mieknathshinde
— Hello Maharashtra (@HelloMaharashtr) September 25, 2022
यातून राज ठाकरेंचा सल्ला किती योग्य होता हे दिसत तसेच बाळासाहेब ठाकरेंविषयी त्यांची श्रद्धा आणि त्यांच्या मनाचा मोठेपणा दिसून येते असं महाजन यांनी म्हंटल. कोर्टाच्या निकालांनंतर लोकांची सहानभूती उद्धव ठाकरेंना मिळाली. दसरा मेळावा सहजासहजी झाला असता तर उद्धव ठाकरेंना एवढी प्रसिद्ध मिळाली नसती. पण कोर्टाच्या निकालामुळे शिवसेनेला संजीवनी मिळाली, त्यांना ऑक्सिजन मिळाल्या सारख झालं असेही प्रकाश महाजन यांनी म्हंटल.