हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुंबई महानगरपालिकेतील नवी वॉर्डरचना जाहीर झाल्यानंतर आता मनसे प्रमुख राज ठाकरे अॅक्शन मोडवर आले आहेत. त्यांनी मुंबईच्या एमआयजी क्लबमध्ये आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (MNS) पदाधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठक बोलवली आहे. या बैठकीसाठी मुंबई, पुणे, पिंपरी-चिंचवड, नाशिक आणि ठाण्यातील मनसेचे पदाधिकारी आणि कार्यकर्तेही उपस्थित राहणार आहेत.
मुंबईसह इतर ठिकाणी असलेल्या महापालिकांच्या प्रभागरचना जाहीर झालेल्या आहरेत. त्यामुळे आता या महानगरपालिकांच्या येत्या काळात निवडणुका होणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर आज मुंबईत मनसे पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली आहे. थोड्याच वेळात या बैठकीला सुरुवात होणार आहे. यावेळी राज ठाकरे एमआयजी क्लबमध्ये मनसैनिकांना मार्गदर्शन करणारआहेत.
राज्यातीळ महत्वाची असलेली मुंबई महानगरपालिकेची निवडणूक सर्वाधिक प्रतिष्ठेची ठरत आहे. या निवडणुकीत शिवसेना विरुद्ध भाजप या दोन पक्षांमध्ये मुख्य लढत असणार आहे. त्यामुळे आज होणाऱ्या बैठकीत मनसे प्रमुख राज ठाकरे नेमकी काय भूमिका जाहीर करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.