हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे आज कोल्हापुरात आपल्या कोकण दौऱ्यासाठी दाखल झाले. यावेळी त्यांनी राज्यपालांनी शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या वक्तव्याचा, उद्धव ठाकरे व मुंबई महापालिका निवडणूक, महाराष्ट्र कर्नाटक वाद आदी विषयांवर त्यांनी परखड मत मांडले. यावेळी त्यांनी मुंबई महापालिकेची निवडणूक स्वतंत्रपणे लढणार असल्याचे सांगितले.
राज ठाकरे यांनी कोल्हापुरात माध्यमांशी संवाद साधला. तत्पूर्वी त्यांनी कोल्हापुरात जावून अंबाबाईचं दर्शन घेतले. यावेळी त्यांनी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीबाबत आपली भूमिका मांडली. मनसे मुंबई महानगर पालिका निवडणूक स्वतंत्र लढणार आहे.या निवडणुकीत मन्सेका चागले यश मिळेल असा विश्वास ठाकरेंनी यावेळी व्यक्त केला. तसेच ते पुढे म्हणाले, पुढचा दौरा पश्चिम महाराष्ट्रात असणार आहे. उद्याच्या कोकण दौऱ्याला अंबाबाईच्या दर्शनाने सुरुवात करणार असून आगामी निवडणुकीबाबत पदाधिकाऱ्यांशी बोलून पुढची पावलं टाकणार आहे.
यावेळी त्यांनी महाराष्ट्र कर्नाटक सीमावादावरही प्रतिक्रिया दिली. महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद प्रश्न मध्येच कसा वर येतो? याच्यामागे काहीतरी कारण आहे. लोकांचे लक्ष वळविण्यासाठी सीमावादाच प्रश्न समोर आणण्यात आला आहे. यावेळी त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज याच्याबद्दल केलेल्या वक्तव्यावरून राज्यपाल कोश्यारी यांच्यावर निशाणा साधला. राज्यपालांवर काय बोलायचे हेच कळत नाही. राज्यपाल कोश्यारी यांना कोणी स्क्रीट लिहून देतं का? असा सवाल ठाकरेंनी उपस्थित केला.
आजारपणावर मिमिक्री नाही तर सध्या परिस्थितीवर टीका केली
यावेळी राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांच्याबाबत केलेल्या टिकेवरही खुलासा केला. मी उद्धव ठाकरे यांच्यावर जी मिमिक्री केली ती त्यांच्या आजारावर नाही तर सध्याच्या परिस्थितीवर टीका केली. कारण जेव्हा ते मुख्यमंत्री होते तेव्हा ते कुणालाच भेटत नव्हते. त्यांनी आजारपणाचे कारण सांगत नागरिकांची भेट घेतली नाही. मात्र, आता एकनाथ शिंदे बाहेर पडले असल्याने हेही बाहेर पडत आहरेत. त्यावेळी त्यांना काय झाले होते. त्यांनी लोकांची भेट का घेतली नाही? असा सवाल राज ठाकरे यांनी केला.
“बालेकिल्ले हलत असतात, यापुढेही हलतील”
यावेळी राज ठाकरे यांनी एक सूचक असे वक्तव्य केले. ते म्हणाल, मी नागपुरलाही बोललो होतो, कोणताही लढा प्रस्थापितांच्या विरोधातच असतो, प्रस्थापितांच्या विरोधात दिलेल्या लढ्याला यश आलेलं तुम्ही 1995 आणि 1999 मध्ये तुम्ही पाहिलं आहे. त्यामुळे बालेकिल्ले कुणाचे हलत नाहीत, असं काही नसतं, बालेकिल्ले हलत असतात, यापुढेही हलतील.”