हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मशिदीवरील भोंग्या वरून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी रान उठवले आहे . 3 मे पर्यंत राज्य सरकारला अल्टिमेटम दिल्यानंतर आजपासून ज्या मशिदीपुढे लाऊडस्पीकर लावून अजान होईल तिथे हनुमान चालीसा लावावी असे आदेश त्यांनी हिंदूंना दिले आहेत . त्यातच आता राज ठाकरेंनी बाळासाहेब ठाकरेंच्या भाषणातील १ विडिओ ट्विट करत पुन्हा एकदा शिवसेनेला डिवचले आहे.
नेमकं काय आहे या व्हिडिओत-
या विडिओ मध्ये बाळासाहेब ठाकरे लोकांना संभोधित करताना म्हणतात की, ज्या दिवशी माझं सरकार या महाराष्ट्रात येईल. त्यावेळी रस्त्यावर केले जाणारे नमाज आम्ही बंद केल्याशिवाय राहणार नाही. धर्म असा असावा लागतो तो राष्ट्रहिताच्या आड येता कामा नये. लोकांना त्याचा उपद्रव होता कामा नये. आमच्या हिंदू धर्माचा जर कुठे कुणाला उपद्रव होणार असेल. त्यांनी मला येऊन सांगावं, आम्ही त्याचा बंदोबस्त करण्यासाठी तयार आहोत. मशिदीवरचे लाऊडस्पीकर खाली येतील, बंद!!
— Raj Thackeray (@RajThackeray) May 4, 2022
दरम्यान, राज ठाकरे यांनी काल रात्री उशिरा ट्विट करत हिंदू बांधवाना मशिदीवरील भोंग्या समोर हनुमान चालीसा लावण्याचे आदेश दिले आहेत. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावरची त्यांनी आपल्या पत्रातून निशाणा साधला. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी कित्येक वर्षांपूर्वी सर्व भोंगे बंद झालेच पाहिजे अशी भूमिका जाहीर केली होती. ते तुम्ही ऐकणार आहात की नाही. की सत्तेवर बसवणाऱ्या बेगडी धर्मनिरपेक्षतावादी शरद पवार यांचे ऐकणार आहात, याचा फैसला महाराष्ट्रातील जनतेसमोर होऊन जाऊ दे, असे आव्हान राज यांनी उद्धव ठाकरे यांना दिले.