मुंबई प्रतिनिधी / मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आगामी लोकसभा निवडणूक लढवणार नसल्याचे जाहीर केले आहे. मात्र तरीही राज ठाकरे राज्यात मनसेच्या मंचावरून राज्यात आठ ते नऊ प्रचार सभा घेणार आहेत. या प्रचार सभा मोदीं विरोधात घेतल्या जाणार आहेत. तसेच मनसे सैनिकांना भाजप विरोधी प्रचाराचे आदेश देण्यात आले आहेत.
मोदींविरोधात प्रचार करण्यासाठी राज ठाकरे या प्रचार सभा घेणार आहेत. महाआघाडीच्या महत्वाच्या उमेदवारांच्या मतदार संघात या प्रचार सभा घेतल्या जाणार आहेत. राज ठाकरे लोकसभा लढणार नसल्याने त्यांच्या या प्रचार सभांचा फायदा महाआघाडीला होणार आहे. मात्र या सभा राष्ट्रवादी किंवा काँग्रेसच्या मंचावरून न करता मनसेच्या मंचावरून केल्या जाणार आहेत.
राज ठाकरे राज्यातील बारामती, मावळ, नाशिक, सोलापूर, नांदेड आणि सातारा या मतदार संघात प्रचार करणार आहेत. तसेच मुंबईतील उत्तर मुंबई, ईशान्य मुंबई आणि उत्तर-मध्य मुंबई या ठिकाणी प्रचार सभा घेणार आहेत. मात्र अद्याप या प्रचार सभांच्या तारखा निश्चित झाल्या नाहीत.
लोकसभा निवडणुकांच्या सर्व ताज्या घडामोडी घरबसल्या मोफत मिळवण्यासाठी आजच आमचा WhatsApp ग्रुप जाॅइन करा. Facebook Page लाईक करा.
WhatsApp Group – 9890324729
Facebook Page – Hello Maharashtra
इतर महत्वाचे –
अहमदनगरमध्ये काँग्रेसचा भाजपला जाहीर पाठिंबा
नगर दक्षिण मतदारसंघासाठी नेत्यांची मोर्चेबांधणी आणि दिल्लीच्या वाऱ्या वाढल्या..
अजित पवारांनी सुजय विखे-पाटील यांना दिली होती ‘ही’ ऑफर
नगरचे नगरसेवक म्हणतात “कोणता झेंडा घेऊ हाती?”
राधाकृष्ण विखेंची भाजप खासदार दिलीप गांधींसोबत खोलीबंद चर्चा
या कारणामुळे मी राष्ट्रवादी सोडून भाजपात गेलो, नरेंन्द्र पाटील यांचा गौप्यस्फोट
मोहिते-पाटलांचा पत्ता कट… भाजपकडून माढा मतदारसंघासाठी ‘हा’ उमेदवार जाहीर