हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने आज मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी मुंबईत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठक घेतली. या बैठकीत राज ठाकरे यांनी स्वबळाचा नारा देत महापालिका निवडणुकीच्या कामाला लागावे. मनसैनिकांनी युतीच्या चर्चेत पडू नये. महापालिका निवडणुकीच्या तयारीला लागावे, असे आदेश ठाकरे यांनी यावेळी दिले.
मुंबईत आज मनसे पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. या बैठकीस मनसे नेते बाळा नांदगावकर, संदीप देशपांडे यांच्यासह महत्वाचे नेते, पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी बैठक संपल्यानंतर मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, सध्या राज ठाकरे यांनी आम्हाला स्वतंत्र लढण्याच्या दृष्टीने तयारी करण्याचे आदेश दिलेले आहेत. आज आमच्या पक्षाचे प्रमुख राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीत निवडणुक, सोशल मीडिया, निवडणुकीच्या दिवशीचे व्यवस्थापन कशा प्रकारे करायचे? या संदर्भातील समित्या स्थापन करण्याच्या सूचना त्यांनी केल्या आहेत. तसेच उमेदवारांची यादी ठरवणे, याबाबतची चर्चा करण्यात आली.
संदीप देशपांडे यांनी यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे याच्यावर निशाणा साधला. मराठी माणसं, हिंदुत्ववादी माणसं शिवेसेनेबरोबर आहेत का? मग शिवसेनेला अनुकुल असे कुठले वॉर्ड? मुळात असं काही नसतं, लोकाची मानसिकता आता शिवसेनेबरोबर नाही, असेही यावेळी देशपांडे यांनी म्हंटले.




