मुंबई प्रतिनिधी । गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्यावर मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. लता मंगेशकर यांची प्रकृती स्थिर असून, त्यांच्या तब्येतीत सुधारणा होत आहे, अशी माहिती मंगेशकर कुटुंबीयांनी बुधवारी दिली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लतादीदींच्या उत्तम आरोग्यासाठी प्रार्थना केली आहे. आजारातून तुम्ही लवकरच ठणठणीत बऱ्या होणार आहात असं ट्वीट राज ठाकरे यांनी केलं आहे.
‘दीदी, तुमच्यातली इच्छाशक्ती आणि तमाम हिंदुस्थानीयांच्या प्रार्थनेचं बळ इतकं मोठं आहे की ह्या आजारातून तुम्ही लवकरच ठणठणीत बऱ्या होणार आहात. आम्ही सगळेच आमच्या दीदींसाठी मनापासून प्रार्थना करतोय’ असं ट्वीट राज ठाकरे यांनीआपल्या ट्विटर अकाऊंटवरून केलं आहे. डॉ. प्रतीत समधानी यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती स्थिर आहे आणि त्या लवकरच घरी परततील, अशी खात्री मंगेशकर कुटुंबीयांनी व्यक्त केली.
दीदी, तुमच्यातली इच्छाशक्ती आणि तमाम हिंदुस्थानीयांच्या प्रार्थनेचं बळ इतकं मोठं आहे की ह्या आजारातून तुम्ही लवकरच ठणठणीत बऱ्या होणार आहात. आम्ही सगळेच आमच्या दीदींसाठी मनापासून प्रार्थना करतोय. @mangeshkarlata #getwellsoon
— Raj Thackeray (@RajThackeray) November 14, 2019
लतादीदी लवकर बऱ्या व्हाव्यात, यासाठी सर्व चाहत्यांनी आणि हितचिंतकांनी केलेल्या प्रार्थनांबाबत मंगेशकर कुटुंबीयांनी सर्वांचे आभारही मानले आहेत. राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी लतादीदींना पत्र लिहिले आहे. ‘तुमच्या प्रकृतीविषयी कळताच मला काळजी वाटली. तुमची प्रकृती लवकरच पूर्वपदावर येईल, अशी मला खात्री आहे,’ अशा सदिच्छा राज्यपालांनी पत्राद्वारे दिल्या आहेत.
Maharashtra Governor Bhagat Singh Koshyari has wished Bharat Ratna Lata Mangeshkar speedy recovery. pic.twitter.com/ItiI49qThY
— Governor of Maharashtra (@maha_governor) November 13, 2019
पहा विडिओ-