पुण्यात दसऱ्यानंतर धडाडणार ‘ठाकरी’ तोफा; उद्धव, राज यांच्या एकाच दिवशी सभा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पुणे प्रतिनिधी । निवडणूक आली की नेत्यांची जाहीर सभांमधूनच जुगलबंदी सुरू होते. त्यात जर दोन ठाकरे आमने-सामने आल्यानंतर ही जुगलबंदी टीपेला पोहचते हे महाराष्ट्राला सर्वश्रुत आहे. विधानसभा निवडणुकीमुळे या दोन ठाकरी तोफा धडाडण्याचा असाच एक योग येत्या बुधवारी पुण्यात आला आहे. विधानसभा निवडणुक प्रचारासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे पुण्यात पहिली जाहीर सभा घेणार आहेत. त्याचवेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे पिंपरी चिंचवडमध्ये शिवसैनिकांना संबोधित करणार आहेत.

राज ठाकरे यांची ९ ऑक्टोबरला पुण्यात टिळक चौकात (अलका चौक) तर त्याच वेळी उद्धव ठाकरे यांची पिंपरीत संध्याकाळी ७ वाजता सभा होणार आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीचं वातावरण तापलं असताना हे दोन ठाकरे बंधू आपल्या सभांमधून कुणाला लक्ष्य करणार, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. दरम्यान, विधानसभा निवडणुकीसाठी मनसेने आपल्या उमेदवारांची घोषणा केली आहे. मात्र मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे गेल्या काही दिवसांपासून शांत असल्याने मनसे सैनिकांमध्ये संभ्रमाचं वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर राज ठाकरे पुण्यात ९ ऑक्टोबरला पहिली सभा घेऊन विधानसभा निवडणुकीतील प्रचाराचा शुभारंभ करणार आहेत.

मात्र त्याआधीच त्यांची अडचण झाल्याचं पाहायला मिळत आहे. लोकसभा निवडणुकीत राज ठाकरे यांनी अखेरच्या टप्प्यात सभा घेऊन राज्यभरात सरकारविरोधात वातावरण निर्मिती करण्याचा प्रयत्न केला होता. त्यांच्या ‘लाव रे तो व्हिडिओ’ची चांगलीच चर्चा ही झाली होती. आताही विधानसभा निवडणुकीत राज ठाकरे मैदान गाजवण्यासाठी सज्ज झाले आहेत. मात्र त्यांच्या सभेसाठी मनसेला मैदानच मिळत नसल्याचं पाहायला मिळत आहे. मनसे पदाधिकाऱ्यांकडून राज ठाकरे यांच्या सभेसाठी प्रशासनाला विविध पर्याय सुचवण्यात आले. मात्र अद्यापपर्यंत राज यांच्या सभेसाठी मैदान मिळू शकलेलं नाही.

इतर महत्वाच्या बातम्या-

 

Leave a Comment