नगराध्यक्षा व भाजपचे नगसेवक टक्केवारीच्या मानसिकतेत ; नगरसेवक राजेंद्रसिंह यादव यांचा हल्लाबोल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

 कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी

कराड, (प्रतिनिधी)- अर्थसंकल्पातील अनेक गोष्टीत बदल होतो आहे. त्या गोष्टीही नगराध्यक्षांसह त्यांच्या सहकाऱ्यांना खटकल्याने त्यांनी गोंधळ घातला आहे असा आरोप करत नगराध्यक्षा व त्यांचे नगसेवक टक्केवारीच्या मानसिकतेत असल्याने कराडच्या विकासाचा खोळंबा झाला आहे असा हल्लाबोल जनशक्ती आघाडीचे नेते राजेंद्रसिंह यादव यांनी केला पत्रकार परिषदेत केला.

श्री. यादव म्हणाले, अर्थसंकल्पीय सभेत पालिकेचा अर्थसंकल्प 134 कोटी 79 लाख 20 हजार 840 रूपयांचा असल्याचे सुचनेव्दारे मांडले होते. मात्र आम्ही मांडलेल्या उपसुचनेसह तो अर्थसंकल्प 270 कोटी 99 लाख 20 हजार 840 रूपयांचा होतो आहे. सार्वजनिक नळावर पाणी भरताना जशी भांडणे असतात, तशा पद्धतीने पालिकेच्या मासिक सभेत नगराध्यक्षा शिंदे वावरतात. त्याच पद्धतीने त्या बोलतात. त्यामुळे पालिकेचे बजेट म्हणजे काय, त्यात काय तरतूदी असतात, त्याचे ज्ञान त्यांना नाही. म्हणूनच अल्पमतात असतानाही हट्टाने सुचना मांडल्या की, त्यावर हरकतीही तेच घेतात. बहुमताचा आदर न करता आपला हेकटपणा करतात. त्यामुळे अर्थसंकल्पात छत्रपती शिवाजी स्टेडीयमची दरवाढ झाली. त्याची माहिती खुद्द नगराध्यक्षांना नसावी, याचे आश्चर्य वाटते. मात्र ती जबाबदारी नगराध्यक्षांचीच आहे, त्यावर त्यांची सही आहे. मात्र ती न स्विकारता थेट प्रशासनाला जबाबदार धरणे दुर्देवी आहे. त्यामुळेच अर्थसंकल्पाची मुळ सुचना जनशक्तीने फेटाळून लावत उपसुचना मांडावी लागली.

कराड नगरपालिकेत काहीजण गेले अनेक वर्ष नगरसेवक म्हणून कारभार पहात आहेत.असे असताना यांचा एवढा अभ्यास नाही की असता शहरासाठी, वार्डातील विकास कामासाठी निधी काय मागायचा ? , तो कसा मागायचा , हेचकळत नसेल तर पालिकेत तुम्ही फक्त खुर्च्या झिजवायला येता का? असा सवाल जनशक्ती आघाडीने भाजपचे नगरसेवक फारुख पटवेकर यांच्यावर उपस्थित केला.
पालिकेत येणे, खुर्चीव बसने, मापे काढणे, विकासकामांचे आकडे बघणे आणि त्यात आपल्याला किती टक्केवारी मिळाले हे पहाणे. हेच काम सध्या नगराध्यक्षा व त्यांच्या आजूबाजूच्या चांडाळ चौकडीचे आहे.त्यांना शहराच्या विकासकामांबाबत काहीही देणं घेणं नाही. त्याचे लक्ष फक्त टक्केवारीकडे लागलेले दिसते अशी कडाडून टीका करत सत्ताधारी जनशक्ती ने नागराध्यक्षा व भाजपच्या नगरसेवकांवर तोफ डागली.

जेष्ठ नगरसेवक विनायक पावसकर यांचे आता वय झाले आहे. ते काहीही बडबडत असतात. त्यांचे ग्यान गेलेलं आहे. सोमवरपेठेत काही दिवसांपूर्वी त्यांनी त्यांच्या वॉर्डातील लोकांवर वाच ठेवण्यासाठी cctv बसवलेले आहेत. स्थायी समितीत त्यांना संधी न मिळाल्याने ते वैफल्यग्रस्त झाले आहे. असेही ते म्हणाले.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘hello news’

Leave a Comment