कोरोना रुग्ण संख्येत पुन्हा वाढ : राजेश टोपेंनी केले ‘हे’ मोठे विधान

0
139
Rajesh Tope
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गेल्या दोन दिवसांत राज्यात अचानक कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. सोमवारी महाराष्ट्रात 59 रुग्ण आढळल्यानंतर मंगळवारी त्यात दुपटीहून अधिक कोरोनाबाधित वाढले आहेत. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने महाराष्ट्रासह चार राज्यांना कोरोनाबाबत काळजी घेण्याचे पत्र पाठवले आहे. याबाबत राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी एक मोठे विधान केले आहे. “आपण परिस्थितीवर लक्ष ठेवून आहोत. पाश्चात्य देशात असलेली परिस्थिती जर आपल्याला जाणवली तर त्या पद्धतीने योग्य वेळी योग्य निर्णय घेतला जाईल”, असे टोपे यांनी म्हंटले आहे.

केंद्र सरकारकडून महाराष्ट्रासह चार राज्यांना पत्र पाठवण्यात आल्यानंतर डॉ. राजेश टोपेंनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, महाराष्ट्रात जी कोरोना रुग्ण संख्या वाढत आहे हि चिंतेची बाबा नाही. मात्र, आपण परिस्थितीवर लक्ष ठेऊन आहोत. आज जरी पाश्चात्य देश असलेल्या युरोप, चीनमध्ये कोरोनाची परिस्थिती निर्माण झाली आहे. काही प्रमाणात दिल्लीतही रुग्ण वाढत आहेत. जर आपल्या इकडे तशी परिस्थिती जाणवली तर त्या पद्धतीने आयसीएमआर, केंद्र सरकार, आमचे टास्क फोर्स, आरोग्य विभाग या सगळ्या गोष्टीत लक्ष ठेवून आहे.

केंद्र सरकारकडून जे पत्र पाठविण्यात आलेले आहे त्या महाराष्ट्रासह पत्रात काही राज्यांचा उल्लेख केला आहे. काल मी घेतलेल्या आढाव्यात महाराष्ट्रात एकूण 135 केसेस आढळल्या आहेत. त्यात मुंबईमध्ये 85 केसेस आहेत. महाराष्ट्राने 60 हजार केसेस रोज पाहिल्या आहेत. त्यामुळे अतिशय नियंत्रित अशी ही परिस्थिती आहे, असेही यावेळी टोपे यांनी सांगितले.

महाराष्ट्राची सध्याची आकडेवारी काय?

महाराष्ट्रात कोरोना रुग्णांचे प्रमाण आढळून आले आहे. गेल्या 24 तासात महाराष्ट्रात 127 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहे. त्यामुळे राज्यातील एकूण कोरोना रुग्णसंख्या 7,876,041 इतकी झाली आहे. तर मंगळवारी तीन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे आतापर्यंत राज्यातील कोरोना बळींची संख्या ही 1,47,830 इतकी झाली आहे. तर गेल्या 24 तासात 108 रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. त्यामुळे राज्यातील एकूण कोरोनामुक्त झालेल्याची संख्या 77,27,551 झाली आहे. सध्या राज्यात 660 सक्रिय रुग्णांवर आरोग्य विभागाच्या वतीने उपचार केले जात आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here