हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | महाराष्ट्राच्या राजकारणात गेले अनेक दिवस विविध घडामोडी घडत आहेत. सत्तास्थापना, त्यानंतरचे नाराजीनाट्य अशा अनेक घडामोडींनंतर आता राज्याच्या राजकारणाला कलाटणी देणाऱ्या घटना घडत आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे व भाजप नेते यांच्यात गेल्या अनेक दिवसापासून जवळीक वाढत आहे. दरम्यान, आज भाजपचे नेते तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सपत्नीक मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची त्यांच्या नवीन निवासस्थान असलेल्या शिवतीर्थावर जाऊन भेट घेतली आहे. या भेटीमागचे कारण मात्र, अजूनही गुलदस्त्यात आहे.
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज पत्नी अमृता फडणवीस यांच्यासह मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ या नव्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली आहे. या भेटीमागचे कारण मात्र, अजूनही गुलदस्त्यात आहेत. राज्यात येत्या काही काळात विधानसभेसह महानगरपालिका आणि इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होण्याच्या मार्गावर आहेत. या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांच्यातील भेट महत्त्वाची मानली जात आहे.
सध्या राज ठाकरे हे आपल्या नवीन निवासस्थान शिवतीर्थ या ठिकाणी राहत आहेत. त्यांनी नवीन निवासस्थानी भेट देण्याचे अनेकांना निमंत्रण दिले आहे. काही दिवसांपूर्वी शिवसेनेचे खासदार संजय राऊत व क्रिकेटर सचिन तेंडुलकर यांनी राज ठाकरे यांच्या नवीन निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली आहे.