मंकीपॉक्स आजाराविषयी आरोग्यमंत्री राजेश टोपेंचे मोठे विधान; म्हणाले…

0
129
Rajesh Tope
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या संपूर्ण जगभर मंकीपॉक्स या नव्या आजाराची चांगलीच चर्चा सुरू झाली आहे. या आजाराबाबत आता भारतात देखील चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. या आजाराचा फैलाव आणि भारतातील परिस्थितीबाबत राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी मोठे विधान केले आहे. “मंकीपॉक्स हा विषाणू हवेतून पसरत नाही. हा माणसाकडून माणसाला किंवा जनावरांकडून माणसाला स्पर्श झाल्याने पसरतो. पुरळ येणे, ताप येणे ही या आजाराची लक्षणं आहेत. एक ते दोन दिवस पुरळ आणि ताप येण्याच्या दरम्यान हा आजार दुसऱ्यांना होण्याची शक्यता आहे”, असे टोपे यांनी सांगितले आहे.

मंत्री राजेश टोपे यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी मंकीपॉक्स या नव्या आजाराबाबत म्हत्वाचाही विधान केले. ते म्हणाले की, मंकीपॉक्स या नव्या आजारावर नियंत्रण आणण्यासाठी महाराष्ट्र सरकारकडून उपाययोजना केल्या जात आहे. मंकीपॉक्स हा दक्षिण आफ्रिकेतून येणारा आजार आहे. ब्रिटन, अमेरिका या देशांमध्ये मंकीपॉक्सच्या काही केसेस आढळल्या आहेत. पण आपल्या देशात एकही मंकीपॉक्सची केस आढळली नाही. तरीही काही लक्षणं आढळत असतील, तर लोकांनी तपासणी करून घ्यावी. हवेतून प्रसार होत नसल्यामुळे लागण होण्याचे प्रमाण फार असू शकत नाही.

नेमकी काय आहेत मंकीपॉक्स विषाणूची लक्षणे ?

यावेळी डॉ. राजेश टोपे यांनी मंकीपॉक्सचा विषाणू कसा पसरतो याविषयी माहिती दिली आहे. “हा विषाणू हवेतून पसरत नाही. हा माणसाकडून माणसाला किंवा जनावरांकडून माणसाला स्पर्श झाल्याने पसरतो. पुरळ येणे, ताप येणे ही या आजाराची लक्षणं आहेत. साधारण २ ते ४ आठवडे हा आजार राहू शकतो. याचा मृत्यूदर १ टक्के ते १० टक्क्यांपर्यंत असल्याचे अभ्यासकांचे मत आहे. एक ते दोन दिवस पुरळ आणि ताप येण्याच्या दरम्यान हा आजार दुसऱ्यांना होण्याची शक्यता आहे”, अशी माहिती टोपेंनी दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here