बलात्काराचे आरोप राजेश विटेकर यांनी फेटाळले; संबंधित महिलेविरुद्ध बदनामीची फिर्याद

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पुणे : तीन महिलांच्या उपस्थितीत तृप्ती देसाई यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे राजेश विटेकर (परभणी) यांचे विरुद्ध बलात्काराचे आरोप काल पुण्यात पत्रकार परिषद घेऊन आरोप केल्यानंतर हे आरोप खोटे आणि बदनामीकारक असल्याचे सांगून राजेश विटेकर यांनी फेटाळले आहेत. आज सायंकाळी पुण्यात प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात त्यांनी आरोप फेटाळले आहेत.

पत्रकार परिषदेत उपस्थित महिलेने ब्लॅकमेलिंग च्या हेतूने अनेकांवर बलात्कार, विनयभंगाचे खोटे गुन्हे दाखल केले आहेत. सोशल मीडियावर बदनामी केली म्हणून या महिलांवर फिर्याद दाखल केलेली आहे, अनेकांप्रमाणे संबंधित महिलेने मलाही जाळयात ओढण्याचा प्रयत्न केला.मी दाद न दिल्याने खोटे आरोप करुन बदनामीचा प्रयत्न चालला आहे.असे विटेकर यांनी या पत्रकात म्हटले आहे. प्रसारमाध्यमांनी दुसरी बाजू देखील मांडावी, असे आवाहन त्यांनी केले आहे.

स्वप्रसिध्दीच्या हव्यासापोटी एखाद्याचे राजकीय व व्यक्तिगत जीवन उध्वस्त करण्याचा हा डाव असून तो यशस्वी होणार नाही, असे विटेकर यांनी म्हटले आहे. संबंधित महिलेविरुद्ध अनेक गुन्हे व खटले दाखल असून न्यायालयीन प्रक्रिया चालू आहे. तरीही तृप्ती देसाई यांनी वस्तुस्थिती जाणून घ्यावी, आणि माझ्यावर अन्याय होणार नाही, याची खबरदारी घ्यावी, असे आवाहन राजेश विटेकर यांनी केले आहे.