राजेश्वरी खरातची फडणवीस मामींना काॅम्पिटिशन; व्हिडिओवर ट्रोलर्सच्या कमेंट्सचा पाऊस

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। फँड्री या मराठी चित्रपटातील शालू भूमिका साकारणारी अभिनेत्री राजेश्वरी सध्या सोशल मीडियावर जबरदस्त ऍक्टिव्ह असते. त्यामुळे ती नेहमीच आपल्या वेगवेगळ्या फोटो आणि व्हिडीओजच्या माध्यमातून प्रेक्षकांना भुरळ पाडण्यात यशस्वी आहे. नुकताच तिने एक घायाळ करणारा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. अनेकजण नेहमीप्रमाणेच तिचे भरभरून कौतुक करत आहेत. तर काहीजण तिची चक्क चेष्टा करताना दिसत आहेत. आजकाल सोशल मीडियावर सर्रास ट्रोलींग केले जाते. त्यामुळे हे काहीसे नवीन नसले तरीही कमेंट्स अगदीच जोरदार आहेत. राजेश्वरीच्या या व्हिडिओवर कमेंट करताना एका युजरने राजेश्वरी फडणवीस मामींना अर्थात अमृता फडणवीस यांना टक्कर देतेय अशा आशयाची कमेंट केली. सध्या हा व्हिडिओ आणि कमेंट दोन्ही चांगल्याच चर्चेत आहेत.

https://www.facebook.com/Rajeshwariofficial/videos/528669241828662

 

अभिनेत्री राजेश्वरी खरातने हा व्हिडिओ तिच्या फेसबुक ऑफिशियल फॅन पेजवर शेअर केला आहे. या व्हिडिओच्या बॅक ग्राऊंडला ‘आंखो में बसे हो तुम’ हे बॉलिवूड जगतातील ९०च्या काळातले सुप्रसिद्ध गाणे चालू आहे. तर कॅप्शनमध्ये तिने लिहिले की, माझी संगीताची आवड ९०च्या दशकात आणि २००० च्या काळात अडकली आहे.

हा व्हिडिओ पाहिल्यावर अनेक प्रेक्षकांनी वाह, छान, मस्त अश्या कमेंट्स करून तिचे भरभरून कौतुक केले आहे. तर एका युजरने लिहिले की, फडणविस मामींना कॉम्पिटिशन जोरदार आहे. किप ईट अप ! या कमेंटनंतर सगळेच प्रश्नात पडले असतील, की खरच राजेश्वरी फडणवीस मामींना कॉम्पिटिशन तर देत नाहीये ना..? मजेची बाब ही की या कमेंट नंतर ट्रॉलर्सने चांगलाच जोर धरला आहे.

https://www.instagram.com/p/COiFhO-pwwR/?utm_source=ig_web_copy_link

फडणवीस मामी अर्थात अमृता फडणवीस म्हणजेच माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी. अलीकडे अमृता फडणवीस यांनी आपले गायन कौशल्य जास्तच मनावर घेतले आहे. कोणताही कार्यक्रम असो किंवा मग एखादी मुलाखत गाण्याचा सूर ओढल्याशिवाय त्यांची उपस्थिती पूर्णच होत नाही. त्यांच्या गायन कौशल्याबाबत बोलायचे झाले तर, त्यांच्या गाण्याच्या त्या स्वतःच भयंकर मोठ्या फॅन आहेत.

https://www.instagram.com/tv/CLR7DR0jMKU/?utm_source=ig_web_copy_link

इतकेच नव्हे तर फेब्रुवारी महिन्यात त्यांचे कल कि किसको खबर हे गाणे देखील प्रदर्शित झाले होते. या गाण्यानंतर ट्रोलर्सने त्यांची चांगलीच पाठ धरली होती. पण ट्रोलिंग होऊनही त्या मागे ह्टल्या नाहीत. एका मुलाखतीत त्यांनी सांगितले कि, लोकांनी कितीही ट्रोल केले तरी मी गाणे गायची थांबणार नाही. अमृता फडणवीस सोशल मीडियावर चांगल्याच ऍक्टिव्ह असतात. त्या नेहमीच विविध मुद्द्यांवर व्यक्त होताना दिसतात. तर आपले फोटो शेअर करतानाही दिसतात आणि लोक यावरून त्यांना पुन्हा पुन्हा ट्रोल करतात.

 

तसं एकदा का ट्रोलींग सुरू झालं की लिहिणाऱ्याचा हात कुणीच धरू शकत नाही. इथेही तसच आहे. एका युजरने सुरूवात केली मग काय बाकीच्यांनी धुरळाच केला. शालू,आयुष्यात रॉस टेलर व्हायच स्वप्न होत, फक्त तुझे कपडे बघून लेडीज टेलर व्हावं वाटत, अशी कमेंट करीत एका युजरने राजेश्वरीच्या फॅशन सेन्सवरच बोटं ठेवलं आहे. तर अन्य एकाने लिहिले रुमाल टाकून जातोय. सध्या काम आहे नंतर व्यक्त होईल. इथे सर्वांनी नोंद घ्यावी.. बापरे बाप अश्या एका पेक्षा एक कमेंट करीत लोकांनी राजेश्वरीला चांगलेच ट्रोल केले आहे. आता या ट्रोलिंगला नक्की जबाबदार कोण म्हणायचं..? राजेश्वरीच्या अदा की फडणवीस मामींचे गाणे…

Leave a Comment