पुणे : कॉंग्रेस खासदार आणि राहुल गांधी यांचे विश्वासू समजले जाणारे राजीव सातव यांचे आज सकाळी निधन झाले. राजीव सातव यांना कोरोनाची लागण झाल्याने पुण्यातील जहांगीर रूग्णालयात उपचार सुरू होते. ते मागील काही दिवस वेंटीलेटरवर होते. काही दिवसांपूर्वीच राजीव सातव यांनी कोरोनावर मात केली होती. त्यांचा अहवाल निगेटीव्ह आला होता. कोरोनावर मात केल्यानंतर त्यांना न्यूमोनियाचा संसर्ग झाल्याने त्यांना वेंटीलेटरवर ठेवण्यात आले होते.
Congress leader Randeep Singh Surjewala expresses grief over the demise of Party's MP Rajeev Satav. pic.twitter.com/R0F2W6PSJM
— ANI (@ANI) May 16, 2021
राजीव सातव हे राहुल गांधी यांचे विश्वासू नेते होते. सातव हे हिंगोलीचे माजी खासदार आहेत. 2014 मध्ये मोदी लाटेतही त्यांचा विजय झाला होता. काँग्रेस आणि गांधी घराण्याची निष्ठा असल्याने त्यांच्याकडे गुजरातच्या काँग्रेस प्रभारीपदाची जबाबदार होती.
सातव यांना झालेल्या न्युमोनियाचा संसर्ग कायम राहिला. त्यामुळे राजीव सातव यांची प्रकृती सुधारते आहे असं वाटत असतानाच ती पुन्हा खालावली. मागील काही दिवसांपासून त्यांना पुन्हा व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं होतं. कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी हे देखील राजीव सातव यांच्या तब्येतीवर लक्ष ठेवून होते. कॉंग्रेसचे वरिष्ठ नेतेही जहांगीर हॉस्पिटलमध्ये येऊन सातव यांच्यावर सुरु असलेल्या उपचारांची माहिती घेत होते.