हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत उमेदवार देण्यासाठी सध्या दिल्ली दरबारी हालचालींना वेग आलेला आहे. या निवडणुकीवरुन सध्या केंद्रातील राजकीय वातावरणही चांगलेच तापले आहे. भाजपाचे वरिष्ठ नेते राजनाथ सिंह हे सध्या योग्य उमेदवार देण्यासंदर्भात चाचपणी करत आहेत. नुकतेच राजनाथ शीह यांनी विरोधी पक्षातील प्रमुख नेत्यांसोबत चर्चा केली आहे. यामध्ये त्यांनी थेट राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनाच फोन लावला असून त्याच्याशी राष्ट्रपती पदाच्या उमेदवार व निवडणुकीबाबत चर्चा केली आहे.
राष्ट्रपतीपदासाठी उमेदवाराची निवड आणि पूर्वनियोजनाची जबाबदारी ही भाजपच्यावतीने संरक्षणमंत्री राजनाथ सिंह आणि पक्षाध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्याकडे देण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर सिंह यांनी मल्लिकार्जून खरगे, ममता बॅनर्जी आणि अखिलेश यादव यांच्याशी फोनवरुन चर्चा केली. यावेळी सर्व नेत्यांसह सिह यांनी शरद पवार यांनाही फोन लावत त्यांच्याशी निवडणुकीसंदर्भात चर्चा केली असून राष्टपतीपदासाठी उमेदवार कोण आहे का? तसेच एकत्रितरित्या उमेदवार निवडीबाबत चर्चा करावी आणि योग्य उमेदवार निवडीसाठी उमेदवारही सुचवावा, असे सिह यांनी यावेळी म्हण्टल्याची दिली आहे.
या नेत्यांची नावे आहेत चर्चेत ?
राष्टपतीपदाच्या उमेदवारीबाबत तृणमूल काँग्रेसने महात्मा गांधींचे नातू गोपालकृष्ण गांधी आणि नॅशनल कॉन्फरन्सचे नेते फारुक अब्दुल्ला, गुलाम नबी आझाद आणि यशवंत सिन्हा यांचे नाव चर्चेत आहे. राष्ट्रपतीपदासाठी १८ जुलै रोजी मतदान होणार असून २१ जुलै रोजी निकाल जाहीर केला जाईल. उमेदवारी अर्ज भरण्यासाठी २९ जून हा अखेरचा दिवस आहे.