प्रकाश आंबेडकर, ओवेसी यांच्यासोबत खा. राजू शेट्टींचा बहुजन वंचित आघाडीत प्रवेश?

Prakash Ambedkar with Raju Shetti
Prakash Ambedkar with Raju Shetti
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई | बहुजन वंचित आघाडी अंतर्गत भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर आणि एमआयएमचे असदुद्दीन ओवैसी यांच्यात निवडणूक आघाडी झाली असतानाच आता स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खा. राजू शेट्टी यांचे सुद्धा या आघाडी सोबत नाव जोडले जात आहे. खा. शेट्टी यांनी आज प्रकाश आंबेडकर यांची मुंबई येथे भेट घेऊन आघाडीसंदर्भात चर्चा केली. यामुळे राजु शेट्टी बहुजन वंचित आघाडी सोबत जाणार काय? अशी राजकिय वर्तळात चर्चा सुरु आहे.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी आणि प्रकाश आंबेडकर यांच्यात आज आगामी लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईत महत्त्वपूर्ण बैठक झाली. या बैठकीला आमदार कपिल पाटील व स्वाभिमानीचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर उपस्थित होते. दरम्यान, प्रकाश आंबेडकर आणि असदुद्दीन ओवेसी यांनी राज्यात युती केली आहे. या युतीला बहुजन वंचित आघाडी असे नाव देण्यात आले आहे.