महागात पडण्याआधी निर्णय बदला; राजू शेट्टींचा मुख्यमंत्री ठाकरेंना इशारा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्य सरकारच्यावतीने पश्चिम महाराष्ट्रासाठी मदत जाहीर केली. राज्य सरकारच्या मदतीवरून स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना इशारा दिला आहे. राज्य सरकारने पूरग्रस्त ऊसउत्पादक शेतकर्याना कमी मदत दिलीय. नुकसान भरपाई देताना पूरग्रस्त शेतकऱ्यांवर अन्याय झाला आहे. त्यामुळे महागात पडण्याआधी निर्णय बदला, असा इशारा शेट्टींनी यावेळी दिला.

यावेळी राजू शेट्टी म्हणाले की, पश्चिम महाराष्ट्रात पावसामुळे व महापुराने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सर्वसामान्य ऊस उत्पादक शेतकऱ्यांना याचा मोठा फटका बसला आहे. त्यांच्या पिकांचे महापुराच्या पाण्यामुळे नुकसान झाले असल्याने त्यांना राज्य सरकारतने मदत दिली आहे. मात्र, ती अत्यंत तोकडी सून त्यामुळे त्यांचे झालेले नुकसान भरून निघणार नाही. परिणामी राज्य सरकारने नुकसान भरपाईचा घेतलेला निर्णय त्वरित बदलावा आणि पुन्हा भरघोस भरपाईच्या मदतीचा निर्णय घ्यावा, अन्यथा महागात पडेल.

राज्य सरकारच्यावतीने चिपळूणष पश्चिम महाराष्ट्रातील पूरग्रस्त भागाला भरघोस स्वरूपात मदत दिली. राज्य सरकारच्या या मदतीवरून भाजपकडून जोरदार टीका केली गेली. भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री ठाकरेंवर मदतीवरून हल्लबोलही केला. त्यांच्यानंतर आता स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी म्हुख्यमंत्री ठाकरेंवर एका कार्यक्रमात निशाणा साधला.

Leave a Comment