अधिकाऱ्यांच्या मृत्यूप्रकरणी साखर सम्राटांचा माज पोलिसांनी उतरावावा – राजू शेट्टी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी ।सकलेन मुलाणी 

खटाव तालुक्यातील पडळ येथील के. एम. शुगर कारखान्यातील अधिकाऱ्यांचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना घडली. या घटनेची सखोल चौकशी करून साखर सम्राटांना एवढा माज आला असेल तर पोलिसांनी तो उतरावावा. याच्यांवर कारवाई होणार नसले, राजकीय हस्तक्षेप होणार असेल तर रस्त्यांवर उतरून या सर्वसामान्यांच्या पोराला न्याय दिल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नसल्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी दिले.

जगदीप धोंडीराम थोरात (वय 40, रा. गोवारे, ता. कराड) असे संशयास्पद मृत्यू झालेल्या अधिकाऱ्यांचे नाव आहे. मारहाण करणाऱ्या संशयितांना अटक केल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नसल्याची भूमिका नातेवाईकांनी घेतली होती. त्यानंतर याप्रकरणात वडूज पोलिस ठाण्यात कारखान्याचे चेअरमन मनोज घोरपडे माजी आमदार प्रभाकर घार्गे यांच्यासह १० ते १२ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणी शेतकरी नेते राजू शेट्टी यांना पत्रकारांनी प्रश्न विचारले असता ते म्हणाले, साखरसम्राटांना माज आला असेल तो पोलिसांनी उतरावावा. तसेच सर्वसामन्यांच्या पोराला न्याय देण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना रस्त्यावर उतरणार असल्याचा इशारा दिला.

सातारा जिल्ह्यासह राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा

Click Here to Join Our WhatsApp Group

 

Leave a Comment