…तर सीरममधून लसीची एकही गाडी बाहेर जाऊ देणार नाही; राजू शेट्टींचा मोदींना इशारा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात कोरोना रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असतानाच लसीच्या पुरवठ्यावरून केंद्र आणि राज्य सरकार आमनेसामने आले असून एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत आहेत. राज्यात कोरोना लसीचा तुटवडा निर्माण झाल्याने राज्यातील लसीकरण मोहीम थंडावली आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी लसीच्या पुरवठ्याच्या संदर्भातील आकडेवारीच जाहीर केली आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील अन्य पक्षांच्या नेत्यांनीही आता केंद्राविरोधात आवाज उठवायला सुरुवात केली आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी केंद्र सरकारला थेट इशाराच दिला आहे.

राजू शेट्टी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि केंद्रीय आरोग्यमंत्री हर्ष वर्धन यांना तसं पत्रच लिहिलं आहे. महाराष्ट्राला होणारा लसीचा पुरवठा येत्या आठवडाभरात न वाढल्यास पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटला घेराव घालण्याचा इशारा शेट्टी यांनी दिला आहे. ‘सीरम इन्स्टिट्यूटमधून लस घेऊन देशाच्या अन्य राज्यांत जाणारी वाहने रोखली जातील,’ असं शेट्टी यांनी पत्रात म्हटलं आहे.

लसींचा पुरवठा वाढवण्याची मागणी राज्यांकडून केंद्राकडे केली जात आहे. लसीचा तुटवडा निर्माण झाल्याने राज्यातील अनेक केंद्र बंद करण्यात आली आहे. तर पुरेशा प्रमाणात लस मिळत नसल्यानं मुंबईत केवळ पुढील आठवडाभर शासकीय लसीकरण केंद्रच सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी हॅलो महाराष्ट्र सोबत जोडले जा. आम्हाला फॉलोअ करा  WhatsApp Group | Facebook Page

Click Here to Join Our WhatsApp Group

You might also like