युती नको की आघाडी! राजू शेट्टींचा स्वबळावर निवडणूक लढवण्याचा ‘स्वाभिमानी’ निर्णय

Raju shetty
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| लोकसभा निवडणूक तोंडावर आल्यामुळे राज्यातील सर्व पक्ष जोरदार तयारीला लागले आहेत. अशातच स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी (Raju Shetty) यांनी लोकसभा निवडणूक स्वभावावर लढवणार असल्याची मोठी माहिती दिली आहे. त्यांनी दिलेल्या माहितीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना आले आहे. तसेच ते महाविकास आघाडीशी किंवा इतर कोणत्या पक्षाशी युती करणार नाही, हे देखील स्पष्ट झाली आहे.

माध्यमांशी बोलताना राजू शेट्टी म्हणाले की, “आता आघाडी – युतीचा अनुभव आला आहे. सत्ता गेली आली कि शेतकऱ्यांची आठवण येते आणि सत्ता आली की शेतकऱ्यांचा विसर पडतोय हा यापूर्वीचा अनुभव घेतलाय. त्यामुळे आता आगामी लोकसभा निवडणूक स्वाभिमानी शेतकरी संघटना स्वबळावर लढवण्यासाठी तयारी करत आहे” तसेच, तुम्ही आमची भूमिका घेऊन मैदानात उतरू, असेही त्यांनी म्हणले आहे.

पुढे राजू शेट्टी यांनी मराठा आंदोलनावर भाष्य केले. यावेळी, “मराठा आरक्षणाला विधीमंडळाचा पाठिंबा असतानाही मराठा समाजाला सरकारने वेठीस धरले. त्यामुळे मराठ्यांचे वादळ निघाले आहे. तसेच अजुनही वेळ गेली नाही कुणावरही अन्याय न होता निर्णय घ्यावा” असा सल्ला राजू शेट्टी यांनी दिला.

महत्वाचे म्हणजे, नेते रविकांत तुपकर यांच्या अटके संदर्भात बोलताना राजू शेट्टी यांनी राज्य सरकारवर जोरदार निशाणा साधला. “सरकारच्या बाजूने शेतकरी आंदोलन दडपण्याचा होत आहे, शेतकरी आत्महत्येत 2.5 टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्यामुळे एकप्रकारे व्यवस्थेचे हात शेतकऱ्यांच्या रक्ताने रंगलेत” असे राजू शेट्टी यांनी म्हणले.