हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शेअर बाजारातील दिग्गज गुंतवणूकदार आणि इंडियाचे वॉरेन बफे’ म्हणून ओळखले जाणारे Rakesh Jhunjhunwala यांचे रविवारी (14 ऑगस्ट 2022) सकाळी हृदयविकाराच्या झटक्याने मुंबईतील रुग्णालयात निधन झाले. ते 62 वर्षांचे होते. 5,000 रुपयांच्या गुंतवणुकीने आपली कारकीर्द सुरू करणारे राकेश झुनझुनवाला आज देशातील सर्वाधिक श्रीमंतांपैकी एक होते. फोर्ब्स मासिकाने दिलेल्या आकडेवारीनुसार त्यांच्याकडे सुमारे 46 हजार कोटींची संपत्ती होती.
Rakesh Jhunjhunwala यांनी आपली बहुतांश संपत्ती शेअर बाजारातील गुंतवणुकीद्वारे वाढवली. शेअर बाजारातील लिस्टेड कंपन्यांमध्ये त्यांची हिस्सेदारी 1 टक्क्यांपासून ते 23 टक्क्यांपर्यंत होती. आपल्या याच गुंतवणुकीच्या जोरावर राकेश झुनझुनवाला यांनी स्वत:ची एअरलाइन कंपनी अकासा एअर सुरू केली, ज्यामध्ये त्यांचा 40 टक्के हिस्सा आहे. आकासा एअरच्या पहिल्याच उड्डाणाच्या दिवशी Rakesh Jhunjhunwala शेवटचे सार्वजनिकरित्या दिसून आले होते. झुनझुनवाला यांनी कोणत्या कंपन्या किंवा कोणत्या क्षेत्रात गुंतवणूक केली आहे हे जाणून घेण्यासाठी गुंतवणूकदारांना नेहमीच उत्सुकता असते. चला तर मग आज आपण त्याची गुंतवणूक किती आणि कुठे होती हे जाणून घेउयात…
Rakesh Jhunjhunwala यांचा पोर्टफोलिओ
इंडियन बोर्सेज (जून 2022) च्या माहिती नुसार, राकेश झुनझुनवाला यांच्या पोर्टफोलिओमध्ये एकूण 32 कंपन्यांचा समावेश होता. त्यांची सर्वाधिक गुंतवणूक (13 टक्के) रिअल इस्टेट आणि कंस्ट्रक्शनमध्ये होती. यानंतर 6-6 टक्के गुंतवणूक फायनान्स (जनरल), फार्मा कंपन्या आणि खाजगी बँकांमध्ये होती. यानंतर कॉम्प्युटर, सॉफ्टवेअर, इन्फ्रा, फुटवेअर, ऑटो आणि पॅकेजिंग यांचा एकूण गुंतवणुकीत 3-3 टक्के वाटा होता. त्याच वेळी त्यांनी सार्वजनिक बँका, खाद्यतेल, सिमेंट, एल्युमिनियम, मीडिया, एंटरटेनमेंट, टेलीकम्युनिकेशन आणि हॉटेल इंडस्ट्रीमध्ये 3-3 टक्के गुंतवणूक केली होती.
कोणत्या कंपनीमध्ये सर्वाधिक गुंतवणूक
जर आपण सर्वाधिक गुंतवणुकीबाबत (रुपयांमध्ये) चर्चा केली तर झुनझुनवाला यांनी टायटन कंपनीमध्ये 11,086.94 कोटी रुपयांची गुंतवणूक केली होती. यानंतर स्टार हेल्थमध्ये 7,017 कोटी रुपये, मेट्रो ब्रँड्समध्ये 3,348 कोटी रुपये, टाटा मोटर्समध्ये 1,731 कोटी रुपये आणि क्रिसिलमध्ये 1,301 कोटी रुपये गुंतवले आहेत. स्टेकबद्दल बोलायचे झाले तर, ऍपटेकमध्ये त्यांची सर्वाधिक 23.37 टक्के हिस्सेदारी होती. त्यापाठोपाठ स्टार हेल्थ (17.49 टक्के) आणि मेट्रो ब्रँड्स (14.43 टक्के) चा नंबर लागतो.
शेअर मार्केटमध्ये रस कुठून आला ???
राकेश झुनझुनवाला हे आपल्या वडिलांना त्यांच्या मित्रासोबत शेअर मार्केटबाबत चर्चा करताना अनेकदा पहायचे. त्यांचे संभाषण ऐकूनच राकेश झुनझुनवाला यांची मार्केटमधील उत्सुकता वाढली. राकेश झुनझुनवाला यांनी एकदा सांगितले होते की, त्यांचे वडील त्यांना नेहमी पेपर वाचण्याचा सल्ला देत असत की, यामुळे बाजारातील अस्थिरतेचे कारण कळत असे.
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://en.wikipedia.org/wiki/Rakesh_Jhunjhunwala
हे पण वाचा :
Rakesh Jhunjhunwala यांच्या निधनाने आर्थिक जगतात शोककळा !!! अनेक दिग्गजांनी वाहिली श्रद्धांजली
Central Bank Of India ने FD वरील व्याजदरात केली वाढ, आता किती फायदा होणार ते पहा !!!
Axis Bank ने FD वरील व्याजदरात पुन्हा केले बदल, आता किती रिटर्न मिळेल ते पहा
NPS-APY खातेधारकांना दिलासा, आता UPI द्वारेही भरता येणार पैसे !!!
Samsung Galaxy Z Fold 4 : Samsung ने लॉन्च केला 2 डिस्प्लेवाला नवा मोबाईल; पहा फीचर्स आणि किंमत