विशाखापट्टणम वायू गळतीला ईश्वरच जबाबदार ; दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांचे ट्विट

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई | ईश्वर जगातील प्रत्येक गोष्ट निर्माण करतो. त्याच्या इशाऱ्याशिवाय व्हायरस किंवा गॅस पसरु शकत नाही. मात्र आपण घटनांना देवाला जबाबदार धरत नाही, कारण आपण त्याला घाबरतो. अस ट्विट करत दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांनी विशाखापट्टणम वायू गळतीवर आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. त्यांचं हे ट्विट सद्या अनेकांचं लक्ष वेधून घेत आहे.

दरम्यान विशाखापट्टणम येथील गोपालपट्टणम येथे आज LG कंपनीत गॅस गळती झाल्याची घटना घडली. या घटनेत 8 कामगारांचा मृत्यू झाला आहे. तर शेकडोजण आजारी पडले असून स्थानिक प्रशासनाने परिसरातील पाच गावं रिकामी केली आहेत. एनडीआरएफच्या पथकाकडून बचावकार्य सुरू आहे. या घटनेवर राम गोपाल वर्मा यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

वायू गळती नेमकी कशामुळे झाली याचे अद्याप कारण स्पष्ट झालेले नाही. घटनास्थळी विशाखापट्टणमचे जिल्हाधिकारी वी विनय चंद हे देखील दाखल झालेले आहेत. त्यांनी सांगितले की, काहीजणांना श्वसनास त्रास जाणवत असल्याने त्यांना रुग्णालयात ऑक्सिजन दिला जात आहे. या दुर्घटनेमुळे बेशुद्ध पडलेले तसेच श्वसनास त्रास होऊ लागलेल्या शेकडो जणांना शहरातली किंग जॉर्ज हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.

Leave a Comment