हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। भारतच नाही तर जगात असे इतरही काही देश आहेत जिथे राम नावाचा गजर सुरु असतो. आज अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर राम मंदिराच्या स्थापने सुरुवात होणार आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हे भूमिपूजन होणार आहे. यानिमित्त जगभरातील राम माहात्म्याची माहिती आपण घेणार आहोत. जगभरात भारत सोडून इतर काही देशांमध्ये रामाची करन्सी चालते. यामध्ये अमेरिका आणि नेदरलँड सारख्या देशांचाही समावेश आहे. या दोन्ही देशात राम नावाची करन्सी चालते. या नोटांवर रामाचा फोटो देखील असतो.
या नोटांना तेथील अधिकृत मुद्रा मानले जात नसले तरी एका मोठ्या वर्तुळात याचा वापर केला जातो. आणि या दोन्ही देशात याला चलन मानले जाते. अमेरिकेतील स्टेट आयोवा मधील एका सोसायटी मध्ये राम मुद्रा चालते. इथे अमेरिकन भारतीय जातीचे आयवे लोक राहतात. या सोसायटीचे लोक महर्षी महेश योगी याना मानतात. महर्षि वैदिक शहरात वसलेले त्यांचे अनुयायी कामांसाठी या मुद्रेचा वापर करतात. २००२ मध्ये द ग्लोबल कंट्री ऑफ वर्ल्ड पीस नामक एका संस्थेने ही मुद्रा जारी करून समर्थकांमध्ये वाटली होती. एका मुद्रेची किंमत १० अमेरिकी डॉलर ठरविण्यात आली आहे. याप्रकारच्या तीन नोटांचे मुद्रण झाले. ज्या नोटेवर एक राम तिचे मूल्य १० डॉलर याप्रमाणे २ आणि ३ राम असणाऱ्या नोटांचे मूल्य अनुक्रमे २० आणि ३० डॉलर असे ठरविण्यात आले.
आश्रमात अंतर्गत व्यवहारासाठी या मुद्रेचा वापर केला जातो. आश्रमाच्या बाहेर जाताना राम मुद्रेच्या इतके डॉलर घेतले जातात. तर नेदरलँड मध्ये राम मुद्रेला कायदेशीर मान्यता मिळाली आहे. इथे रामाच्या एका फोटोच्या बदल्यात १० युरो मिळतात. एका वृत्तवाहिनीच्या अहवालानुसार डच सेंट्रल बँकेच्या मते सध्या नेदरलँड मध्ये एक लाख राम मुद्रा चलनात आहेत. या मुद्रांच्या बदल्यात लोक बँकेतून १० युरो घेतात.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.