हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे महाविकास आघाडीचे सरकार असलं तरी काही नेत्यांना शिवसेना-भाजपने पुन्हा एकदा एकत्र यावे अशी इच्छा आहे. त्यातच आरपीआयचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी एक नवा फॉर्म्युला देत पुन्हा एकदा युतीची आशा व्यक्त केली आहे. भाजप-शिवसेनेने युती करावी आणि राज्याचं मुख्यमंत्रीपद शिवसेनेला देण्यात यावं, असा फॉर्म्युला रामदास आठवले यांनी सूचवला आहे.
शिवसेना-भाजप-आरपीआय महायुतीचे सरकार पुन्हा स्थपन करणे हीच शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांना खरी अदारांजली ठरेल. त्यासाठी शिवसेनेला 5 वर्षे मुख्यमंत्री पद देऊन भाजपला सत्तेतील 50 टक्के वाटा देऊन पुन्हा शिवशक्ती-भीमशक्ती महायुतीचे सरकार स्थापन करावे, असा सल्ला आठवले यांनी दिला आहे.
बाळासाहेब ठाकरे यांनी शिवशक्ती-भीमशक्ती-भाजप महायुतीची एकजूट उभी केली होती. काँग्रेस-राष्ट्रवादीला हद्दपार करून भाजप-शिवसेना-आरपीआय शिवशक्ती-भिमशक्ती महायुतीचे सरकार स्थापन करण्याचे त्यांचे स्वप्न होते. ते साकार करण्यासाठी पुन्हा भाजप-शिवसेनेने एकत्र यावे.