हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मुळेच शिवसेना फुटली असा थेट आरोप माजी मंत्री रामदास कदम यांनी केला होता. मात्र केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी मात्र या सर्व घडामोडींना शिवसेना खासदार संजय राऊत यांना जबाबदार धरले आहे. शरद पवारांनी नव्हे तर संजय राऊत यांनी शिवसेना फोडली असा थेट आरोप त्यांनी केलाय. एका वृत्तवाहिनीशी ते बोलत होते.
संजय राऊत यांच्या सांगण्यावरूनच उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस- राष्ट्रवादीशी आघाडी केली. संजय राऊतांनी गडबड केली नसती तर शिवसेना आणि राष्ट्रवादी एकत्र आली नसती तर महाराष्ट्रात भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेचं सरकारं आलं असतं असं देखील ते म्हणाले. त्यामुळे शिवसेनेतील फुटीला संजय राऊत जबाबदार आहेत अस आठवले म्हणाले.
रामदास कदम यांचा आरोप काय??
रामदास कदम यांनी शिवसेना नेतेपदाचा राजीनामा देताना शरद पवारांवर गंभीर केले. शरद पवार आणि अजित पवारांमुळेच शिवसेना फुटली. उद्धव ठाकरे आजारी होते, तर दुसरीकडे अजित पवारांकडे प्रशासनाचा प्रचंड अनुभव असल्याने त्यांनी त्याचा फायदा राष्ट्रवादी साठी करून घेतला असा आरोप रामदास कदम यांनी केला होता.