पवारांनी ज्यांची कॉलर ओढली ; ती सीट आम्ही पाडली : रामदास आठवले

1
43
Untitled design
Untitled design
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । सकलेन मुलाणी

लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराला आता सुरुवात झाली सुरुवात झाली असून रामदास आठवले यांनी देखील शिवसेनेचे उमेदवार नरेंद्र पाटील यांच्या प्रचारार्थ आज सातारचा दौरा केला आहे. ज्यांची कॉलर शरद पवार यांनी चांगले भाषण केले म्हणून ओढली ती जागा आम्ही आमच्या ताब्यात घेणार आहे. अशा आशयाची कविता रामदास आठवले यांनी पत्रकरांना ऐकवून दाखवली आहे. ते सातारामध्ये पत्रकारांशी बोलत होते.

आपल्या कवितांनी सर्वांना मंत्रमुग्ध करणारे केंद्रीय मंत्री रामदास आठवले आज सातारमध्ये महायुतीच्या प्रचाराला आले होते. सातारच्या जागेवर रामदास आठवलेंचे भाकीत वर्तवणारी कविता ऐकून पत्रकारांमध्ये हशा पिकवला आहे. गत निवडणुकीत सातारा लोकसभा मतदारसंघ रामदास आठवले यांच्या रिपाई पक्षाने लढला होता. यावेळी मात्र या ठिकाणी शिवसेने दावा शेवट पर्यंत सोडला नाही म्हणून भाजपच्या नरेंद्र पाटील यांनी शिवसेनेत प्रवेशकरून या ठिकाणी लोकसभा निवडणूक लढवली आहे.

राष्ट्रवादीचे विद्यमान खासदार उदयनराजे भोसले यांच्या विरुद्ध नरेंद्र पाटील असा सामना साताऱ्यात पाहण्यास मिळणार आहे. तर गतवेळी सर्वच विरोधी उमेदवारांची अनामत रक्कम जप्त करणाऱ्या उदयनराजे भोसले यांना यावेळी मात्र नरेंद्र पाटील यांच्या कडव्या आव्हानाचा सामना करावा लागणार आहे.

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here