नवी दिल्ली | ना मोदींना भेटलो ना अमित शहांना भेटलो तरी केंद्रात मंत्री झालो. त्यामुळे मंत्री कसे व्हायचे हे माझ्याकडून शिकून घ्या असे मत केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केले आहे. रामदास आठवले यांनी पत्रकारांशी संवाद साधला असता हे वक्तव्य दिले आहे.
आपल्या रिपब्लिक पार्टी ऑफ इंडियाला एक तरी लोकसभेची जागा द्यावी या साठी आपण प्रयत्न केले मात्र भाजपने आपल्याला एक हि जागा दिली नाही. मात्र आपल्याला केंद्रात मंत्रिपद दिले. त्यामुळे मंत्रिपद कसे मिळवायचे असते हे आपल्या कडून शिकून घ्या असे रामदास आठवले म्हणाले आहेत. रामदास आठवले यांनी लोकसभा निवडणुकीत सर्वाधिक सभा घेवून युतीच्या उमेदवारांचा निस्वार्थ भावनेने प्रचार केल्यामुळे त्यांचे मंत्री मंडळातील स्थान कायम ठेवण्यात आले आहे असे राजकीय वर्तुळात बोलले जाते आहे.
रामदास आठवले यांनी शरद पवार यांच्यावर भाष्य करण्याची संधी सोडली नाही. शरद पवार यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये विलीन करू नये तर त्यांनी एनडीए मध्ये समाविष्ट व्हावे असे रामदास आठवले यांनी म्हणले आहे. तसेच मी इकडे भाजप सोबत असताना शरद पवार तिकडे कॉंग्रेससोबत असल्याचे बरे दिसत नाही असे रामदास आठवले म्हणाले आहेत.