हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । रिपब्लिकन पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी सोमवारी औरंगाबादचा दौरा केला. यावेळी त्यांनी उत्तर प्रदेशातील निवडणुकीवर काही मते मांडले. तसेच बहुजन वंचित आघाडीच्या प्रकाश आंबेडकर यांनाही सल्ला दिला. “प्रकाश आंबेडकरांनी गांभीर विचार करावा कि मत खाण्याच्या राजकारणात समाजाचं भलं होणार नाही, जिंकून येणे गरजेचे आहे. प्रकाश आंबेडकर यांना शुभेच्छा मात्र यापूर्वी त्यांनी जागा निवडणून आणल्या नाहीत,” असे सूचक वक्तव्य आठवले यांनी केले.
केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी औरंगाबाद येथे बहुजन वंचित आघाडीच्यावतीने निवडणुक लढवली जात असल्याने याबाबत आपली भूमिका मांडली. यावेळी ते म्हणाले की, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी रिपब्लिकन पक्ष स्थापन केला.
डॉ. आंबेडकरांनी सुरु केलेल्या या पक्षाला सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहचवण्यासाची, व्यापक करण्याची आज खऱ्या अर्थाने गरज आहे. एकच लक्ष रिपलिकन पक्ष असा निरा दिला पाहिजे, प्रकाश आंबेडकर सोबत आल्याशिवाय ऐक्य शक्य नाही,” असेही आठवले यांनी म्हटले.