“भाजप-शिवसेना युतीसाठी प्रयत्न करणार, राऊतांची घेणार भेट”; रामदास आठवलेंचे मोठे विधान

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्रात भाजप आणि शिवसेना युतीबाबत केंद्रीयमंत्री रामदास आठवले यांनी मोठे विधान केले आहे. शिवसेनेने आता अडीच वर्ष सत्ता भोगली आहे तेव्हा त्यांनी भाजपला संधी द्यावी. शिवसेनेने भाजप सोबत येऊन पुन्हा एकदा युती करावी यासाठी मी स्वतः प्रयत्न करणार आहे. यासाठी मी संजय राऊत यांची भेट घेणार असल्याचे मोठे विधान आठवले यांनी केले आहे.

रामदास आठवले यांनी औरंगाबाद येथे माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी भाजप शिवसेना युतीबाबत मोठे विधान केले. यावेळी ते म्हणाले की, “महविकास आघाडीत शिवसेनेचे मोठे नुकसान होत आहे. आता खरी वेळ आली आहे की शिवसेनेने भाजपसोबत युती करावी. शिवसेनेने अडीच वर्षे सत्ता भोगली आहे. आता भाजपसोबत युती करून शिवसेनेने भाजपला संधी द्यावी.”

राज्यात सध्या महाविकास आघाडी सरकार आहे. महाराष्ट्राच्या भल्यासाठी शिवसेनेने पुढाकार घेऊन भाजपसोबतचे भांडण मिटवावे. आम्हाला काही सत्तेची आवश्यकता नाही. महाविकास आघाडी सरकारला आता अडीच वर्ष होत आलेली आहेत. अडीच वर्षाच्या फॉर्म्युल्यावर शिवसेना विचार करत असेल आणि भाजपही त्या फॉर्म्युल्यावर तयार होऊ शकेल. शिवसेना भाजप युती घडवून आणण्यासाठी प्रयत्न करणार आहे. यासाठी मी संजय राऊत यांना भेटून युतीसाठी आग्रह धरणार असल्याचे आठवले यांनी म्हंटले.

Leave a Comment