पालापाचोळा कोणाचा झाला याचं आत्मपरीक्षण करा; रामदास कदमांचा उद्धव ठाकरेंवर घणाघात

ramdas kadam uddhav thackeray
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शिवसेना बंडखोर नेते रामदास कदम यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली आहे. पालापाचोळा कोणाचा झाला याच तुम्हीच आत्मपरीक्षण करा असं म्हणत उद्धव ठाकरेंनीच बाळासाहेबांच्या पाठीत खंजीर खुपसलं अशी जोरदार टीका रामदास कदम त्यांनी उद्धव ठाकरेंवर केली आहे. ते एका वृत्तवाहिनीशी बोलत होते.

मी उद्धव ठाकरेंना पक्षप्रमुख म्हणणार नाही, माजी मुख्यमंत्री म्हणूनच वाढदिवसाच्या
शुभेच्छा देईन. त्यांनी जर शरद पवारांऐवजी बाळासाहेबांच्या विचारांचा नेतृत्व ठेवलं असतं तर मी त्यांना शिवसेना पक्षप्रमुख म्हटलं असतं. पण आज ते बाळासाहेबांचे सुपुत्र म्हणून काम करत नाहीत. तर शरद पवारांच्या मांडीवर बसून, त्यांच्या विचारांशी सहमन होऊन काम करत आहेत. बाळासाहेबांच्या विचारांशी गद्दारी, बेईमानी, पाठीत खंजीर खुपसण्याचं काम उद्धव ठाकरेंनी केलं आहे असा आरोपही त्यांनी केला आहे.

उद्धव ठाकरे याना मराठा नेत्यांना मोठं होऊ द्यायचं नाही. त्यांना संपवायचं आहे. असा खळबळजनक आरोप रामदास कदम यांनी केला आहे.  नारायण राणे, एकनाथ शिंदे, रामदास कदम ही त्याची उदाहरणं आहेत. कुठल्याही मराठा नेत्याला ते मोठं होऊ देत नाहीत. उद्धव ठाकरे रुग्णालयात असताना कदम कुटुंबाला संपवून टाकण्यासाठी सहा बैठका झाल्या. रुग्णालयात असतानाही आमच्याविरोधात कटकारस्थान करुन संपवायला निघाला असाल, तर तुम्ही आम्हाला नाही शिवसेनेला संपवत आहात असंही रामदास कदम म्हणाले.