हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मुंबईतील अंधेरी पूर्व मतदारसंघाचे विद्यमान आमदार रमेश लटके यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले आहे. लटके हे सहकुटुंब दुबईला फिरायला गेले होते. तिथेच त्याना हृदयविकाराचा झटका आला. ते ५२ वर्षांचे होते. रमेश लटके यांच्या निधनाने शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे.
रमेश लटके यांचे पार्थिव मुंबईत आणण्यासाठी हालचाली सुरू असून लवकरच त्यांचे पार्थिव मुंबईत आणले जाईल. त्यांच्या निधनाचे वृत्त कळताच समर्थकांनी मुंबईतील घराबाहेर गर्दी केली आहे.
Maharashtra | Shiv Sena MLA from Andheri East Ramesh Latke passes away due to a heart attack
— ANI (@ANI) May 11, 2022
सार्वजनिक गणेश मंडळाच्या अध्यक्षपदापासून आपल्या कारकिर्दीची सुरुवात करणारे रमेश लटके यांचा गटप्रमुख ते आमदार असा जबरदस्त राजकीय प्रवास होता. लोकांमध्ये मिसळणारे नेते अशी त्यांची ओळख होती. 2014 मध्ये रमेश लटके यांनी पहिल्यांदा अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. तेव्हा ते विजयी झाले. त्यानंतर 2019 ला पुन्हा एकदा जनतेने त्यांना निवडून दिले होते.