Ramgad : रत्नागिरी जिल्ह्यात सापडला नवीन किल्ला, याविषयीची सर्व माहिती जाणून घ्या

Ramgad
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Ramgad : शिवकालापासून महाराष्ट्राला किल्ल्यांचा विस्तृत इतिहास लाभलेला आहे. या प्रत्येक किल्ल्यांचे असे स्वतःचे महत्त्व देखील आहे. आता दुर्गप्रेमींसाठी नुकतीच एक आनंदाची बातमी समोर आली आहे. कारण किल्ले अभ्यासकांना महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आजपर्यंत अंधारात असलेला एक नवीन किल्ला आढळून आला आहे. रत्नागिरीमधील पालगड गावाजवळील रामगड येथे हा किल्ला आढळला आहे. दुर्ग अभ्यासक डॉ. संदीप परांजपे आणि डेक्कन कॉलेजचे पुरातत्त्व अभ्यासक सचिन जोशी यांनी या रामगडाचा शोध लावला आहे. तसेच यावेळी त्यांनी त्याचे ऐतिहासिक संदर्भ आणि वास्तूरचनेतील शास्त्रीय पुराव्यांवर आधारित एक प्राथमिक अहवाल देखील प्रसिद्ध केला आहे. Ramgad

Ramgad Fort

डॉ. संदीप परांजपे आणि सचिन जोशी यांनी नुकत्याच झालेल्या इतिहास संशोधक मंडळाच्या बैठकीमध्ये रामगडाबाबत अहवाल सादर केला. यावेळी इतर अभ्यासकांकडून विचारण्यात आलेल्या शंकांचे निरसनही करण्यात आले. अशा प्रकारे बैठकीतील चर्चेतून रामगड हा एक अप्रकाशित दुर्ग असल्याचे समोर आले आहे. Ramgad

Ratnagiri Fort News, New Fort Discovered in Maharashtra; Satellite images of  the fort were also taken, remains of construction were found – new fort  discovered in Maharashtra Ratnagiri district Ramgad satellite images

याबाबत अधिक द्यायची झाली तर ती अशी कि, रत्नागिरी जिल्ह्यातील साने गुरुजींच्या ‘पालगड’ गावाच्या पूर्वेस दापोली-खेड तालुक्याच्या सीमेवर रामगड हा छोटेखानी किल्ला आहे. पालगडाचा रामगड हा जोडकिल्ला असून, आजवर कधीही या किल्ल्याची स्थाननिश्चिती झालेली नव्हती. हे लक्षात घ्या कि, महाराष्ट्रात रामगड नावाचे दोन किल्ले असून, यातील पहिला, जो सर्वाना माहिती असलेला रामगड किल्ला हा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यामध्ये आहे. तर दुसरा रामगड किल्ला हा रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यामध्ये आहे. मात्र या किल्ल्याची बांधणी कोणत्या काळात झाली याबाबत अजूनही काहीही माहिती मिळालेली नाही. मात्र, हा किल्लादेखील पालगडाबरोबरच बांधला गेला असावा, असा अंदाज संदीप परांजपे आणि सचिन जोशी यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला आहे. Ramgad

Ramgad Fort

हे पण वाचा :
Jio च्या ‘या’ प्लॅन अंतर्गत Netflix सबस्क्रिप्शन सहीत मिळवा अनेक फायदे
आता Visa शिवाय ‘या’ देशांत मिळणार प्रवेश, सर्वात स्वस्त देश कोणता ते पहा
एका Credit Card चे बिल दुसऱ्या क्रेडिट कार्डने भरा, फॉलो करा ‘या’ 3 स्टेप्स
New Business Idea : वर्षभर मागणी असणारा ‘हा’ व्यवसाय सुरु करून मिळवा हजारो रुपयांचे उत्पन्न
Bank Loan वसुलीचे नियम काय आहेत ??? बँकेच्या एजंटने कर्जाच्या वसुलीसाठी धमकावल्यास त्वरित करा ‘हे’ काम