मुंबई | अभिनेते रंजीत चौधरी यांचं १५ एप्रिल रोजी निधन झालं. रंजीत यांच्या निधनाची बातमी त्यांची सावत्र बहीण रैल पद्मसी यांनी सोशल मीडियावर दिली. यानंतर अनेक सेलिब्रिटी सोशल मीडियावर त्यांना श्रद्धांजली वाहत आहेत. ते 64 वर्षांचे होते. रंजीत चौधरी यांचं निधन नक्की कशावरून झालं हे हे अजुन स्पष्ट झालं नाही. त्यांनी ‘खूबसूरत’ आणि खट्टामिठा या सिनेमांमध्ये काम केलेलं आहे.
१५ एप्रिलला रंजीत यांनी अखेरचा श्वास घेतला. आज गुरुवारी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. यानंतर लॉकडाउन संपल्यावर ५ मे रोजी शोकसभेचं आयोजन करण्यात आलं आहे. यावेळी त्यांच्या आठवणींना उजाळा देण्यात येईल. असं रैल यांनी सोशल मीडियावर शेअर केलेल्या पोस्टमध्ये लिहिले आहे.
रंजीत यांनी मीरा नायर यांच्या ‘मिस्सीसिप्पी मसाला’, ‘फायर’, ‘कामसूत्र: अ टेल ऑफ लव’ यांसारख्या बॉलिवूडपासून हॉलिवूडपर्यंतच्या अनेक सिनेमांमध्ये काम केलं आहे.